Pornography case : राज कुंद्राची अखेर तुरूंगातून सुटका! न्यायालयालयाकडून मोठा दिलासा

पॉर्न प्रकरणात राज कुंद्राला करण्यात आली होती अटक
Pornography case : राज कुंद्राची अखेर तुरूंगातून सुटका! न्यायालयालयाकडून मोठा दिलासा

शिल्पा शेट्टीचा पती आणि पोर्नोग्राफी प्रकरणात अडकलेला राज कुंद्रा याला 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. Metropolitan magistrate court ने राज कुंद्राला जामीन मंजूर केला आहे. राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पॉर्न प्रकरणात त्याचं नाव आल्यानंतर गहना वसिष्ठ, शर्लिन चोप्रा यांनीही त्याच्यावर काही आरोप केले होते. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

Pornography case : राज कुंद्राची अखेर तुरूंगातून सुटका! न्यायालयालयाकडून मोठा दिलासा
Raj Kundra Pornography case: 1500 पानांचं आरोपपत्र दाखल, 58 साक्षीदारांच्या साक्षींची नोंद

राज कुंद्राविरोधात सायबर गुन्हे शाखेनं गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात पोर्नोग्राफीच्या पहिल्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये 'आर्मप्राईम मीडिया प्राईव्हेट लिमिटेड' नामक कंपनीकडून आपल्याशी संपर्क साधला गेला होता. त्या अॅपमार्फत नवोदित प्रतिभावंत कलाकारांना त्यांचा अभिनय डिजिटल माध्यमातून दाखवण्याची संधी देण्यात येणार होती. त्यांची संकल्पना आवडली आणि व्यवसायिक म्हणून आपण त्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याचं कुंद्रानं आपल्या याचिकेत म्हटलेलं आहे.

त्यानुसार फेब्रुवारी ते डिसेंबर 2019 दरम्यान संबंधित कंपनीशी करार करण्यात आला होता. त्यादरम्यान आपला चित्रपट निर्मितीमध्ये जराही सक्रिय सहभाग नव्हता. तसेच हॉटशॉट्स अॅपमधील पोर्नोग्राफीशीही आपला काहीही संबंध नसून आपल्यावरील आरोप हे खोटे असून आपल्याला यात गोवण्यात आल्याचा दावाही राज कुंद्रानं कोर्टापुढे केला आहे.

काय होती मोडस ओपरंडी?

फेब्रुवारी 2021 मध्ये क्राईम ब्रांचने एक केस मालवणी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. ही केस अश्लील फिल्म किंवा ज्याला पॉर्न फिल्म म्हणता येईल अशा संदर्भातली होती. या केसच्या तपासात असं निष्पन्न झालं होतं की फिल्ममध्ये काम करू इच्छिणाऱ्या नवख्या महिला कलाकारांना वेब सीरिज किंवा शॉर्ट फिल्ममध्ये चांगला ब्रेक देतो असं आमिष देऊन त्यांना ऑडिशनसाठी बोलवण्यात येत असे. वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन करावे लागतील असं सांगण्यात यायचं.

या बोल्ड सीनमध्ये काही सेमी न्यूड आणि न्यूड सीनही चित्रित करण्यात यायचे. याला महिला कलाकारांनी आक्षेप घेतला होता आणि हीच तक्रार घेऊन यातल्या काही महिला कलाकारांनी पोलीस ठाणं गाठलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास करताना असं लक्षात आलं की छोटे छोटे सीन किंवा शॉर्ट स्टोरीज तयार करून काही वेबसाईट्स आणि काही मोबाईल अॅप्सना विकल्या जात होत्या. यामध्ये नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. उमेश कामत, रोहा खान, गहना वसिष्ठ, तन्वीर हश्मी असे आरोपी अटकेत केले आहेत. हे वेगवेगळ्या अॅप्सला हे लोक हा कंटेंट विकत असत. सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर या प्रकरणी पुढील अकाऊटिंग होत असे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in