अभिनेत्री कंगना रणौतला कोर्टाचा दणका, ‘तो’ खटला दुसरीकडे वर्ग करण्याची मागणी फेटाळली
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला मुंबई सत्र न्यायालयानं दणका दिला आहे. कंगनाचा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानी प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या कोर्टावर आपला भरवसा नाही, असं स्पष्ट करत या कोर्टातील आपली प्रकरणं दुसऱ्या कोर्टापुढे वर्ग करण्यात यावी अशी मागणी करणारा अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळून लावला. याआधी […]
ADVERTISEMENT

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला मुंबई सत्र न्यायालयानं दणका दिला आहे. कंगनाचा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानी प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या कोर्टावर आपला भरवसा नाही, असं स्पष्ट करत या कोर्टातील आपली प्रकरणं दुसऱ्या कोर्टापुढे वर्ग करण्यात यावी अशी मागणी करणारा अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळून लावला. याआधी मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टानंही कंगनाचा याबाबतचा अर्ज फेटाळून लावला होता. त्याच निर्णयाला कंगनानं मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं.
आपली बाजू न ऐकता बेकायदेशीरपणे या कोर्टानं आपल्याविरोधात अटक वॉरंट जारी केला. असा आरोप कंगनानं या अर्जातून केला होता. अंधेरी दंडाधिकारी कोर्टाविरोधातील ही मागणी फेटाळून लावताना सत्र न्यायालयानं कंगनाविरोधातील कारवाई कायदेशीर ठरवली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यु. बगाले यांच्यासमोर यावर सुनावणी पार पडली.
कंगनाच्या वतीनं अॅड. रिजवान सिद्दीकी यांनी कंगनाच्यावतीनं अंधेरी कोर्टाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र याला जावेद अख्तर यांचे वकील भारद्वाज यांनी जोरदार आक्षेप घेतला. प्रत्येकवेळी नव्या सबबी सांगून निव्वळ कोर्टाचा वेळ फुटक घालवला जात असल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं.