Mumbai Drugs Case: आर्यनला ड्रग्स प्रकरणात अडकवलं गेलं? ‘त्या’ दोघांमुळे विचारला जातोय प्रश्न
मुंबई: मुंबईतील क्रूझवरील ड्रग्स पार्टी छाप्यादरम्यान नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या टीमने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना अटक केली. परंतु या संपूर्ण प्रकरणात तीन लोक असे आहेत की जे आता NCB साठी डोकेदुखी ठरु शकतात. कारण या लोकांपैकी एक व्यक्ती तो आहे की, ज्याने या प्रकरणाची माहिती दिली होती. याच माहितीच्या […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबईतील क्रूझवरील ड्रग्स पार्टी छाप्यादरम्यान नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या टीमने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना अटक केली. परंतु या संपूर्ण प्रकरणात तीन लोक असे आहेत की जे आता NCB साठी डोकेदुखी ठरु शकतात. कारण या लोकांपैकी एक व्यक्ती तो आहे की, ज्याने या प्रकरणाची माहिती दिली होती. याच माहितीच्या आधारे एनसीबीने ही छापेमारी केली होती. तर दोन लोक असे आहेत की, ज्यांच्यामुळे आता NCB च्या कामकाजावरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आता या संपूर्ण प्रकरणात भोपाळ कनेक्शन समोर येत आहे. कारण भोपाळचा रहिवासी नीरज यादव यानेच क्रूझवरील रेव्ह पार्टीची माहिती दिली असल्याचं बोललं जात आहे. नीरज यादव यांची ओळख मनिष भानुशाली आणि केपी गोसावी यांच्याशी देखील आहे. यांचेच काही फोन कॉल आणि व्हीडिओ आता समोर आले आहेत. भानुशाली आणि गोसावी ही ती दोन माणसे आहेत जी क्रूझवरील छाप्यादरम्यान आर्यन खान आणि अरबाज मर्चंटला हाताला धरुन घेऊन NCB कार्यालयात घेऊन जात असताना दिसले होते.
NCB च्या छापेमारीत हे दोघे जण सामील झाल्याने आता या कारवाईबाबत बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी सवाल उपस्थित केले तेव्हा मात्र, एनसीबीने दोघांबद्दल स्पष्टीकरण देताना सांगितलं की, हे दोघं या प्रकरणात स्वतंत्र साक्षीदार आहेत.
फोन कॉलचा पुरावा