Mumbai-Goa Highway : ‘चमकोमॅन’ वर भरोसा ठेवणार का..?, मनसेने भाजप नेत्याला डिवचले
गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचा विषय चर्चेत आहेत.ऐन गणेशोत्सवाच्या काळातच या महामार्गावर लांबच लांब रांगा लागत कोकणात जाणाऱ्या लोकांचे हाल होत असल्याने अमेय खोपकर यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.
ADVERTISEMENT

MNS Vs BJP : मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न आजचा नाही, गेल्या कित्येक वर्षापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तो चर्चेला गेला आहे. गणेशोत्सवाच्या काळातही दरवर्षी मुंबई ते गोवा महामार्गाचा प्रश्न ऐरणीवर येतो. त्याच प्रमाणे आजही आणि गणेशोत्सव अगदी तोंडावर आला असताना मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी या महामार्गाचा व्हिडीओ करत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सोशल मीडियावर मुंबई-गोवा महामार्गाचा (mumbai-goa highway) व्हिडीओ शेअर करत त्यांनी अजूनही या चमकोमॅनवर भरोसा ठेवणार का असा सवाल अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी केला आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या काळात या चाकरमान्यांच्या गैससोयीवरुन राजकारण तापणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा >> BJP vs Shivsena : ‘त्यांच्याकडे धनुष्यबाण तर माझ्याकडे रॉकेट’, भाजप आमदाराच्या वक्तव्याने शिवसेना आवाक
तुमचा खोटारडेपणा आणि अकार्यक्षमता
मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी मुंबई-गोवा महामार्गावरचा वाहनांच्या लागलेल्या लांबच लांब लागलेल्या रांगा आणि खराब झालेला रस्ता व्हिडीओमध्ये दाखवण्यात आला आहे. त्यावरुन त्यांच्यावर टीका करत ऐन गणेशोत्सवाच्या काळातही नागरिकांना आपल्या गावी योग्य पद्धतीने जाता येत नसेल तर चमकोमॅनवर भरोसा ठेवणार का असा सवालही त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी त्यांना धन्यवाद देत तुमचा खोटारडेपणा आणि अकार्यक्षम असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
वाहनांच्या रांगाच रांगा
मुंबई-गोवा महामार्गावर ऐन गणेशोत्सवाच्या काळात वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याने अमेय खोपककर यांनी त्यांना चमकोमॅन म्हणूनही हिणवले आहे. कारण गणेशोत्सवाआधीच या मार्गावरची बांधकामाची कामं करणे गरजेचे असते मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही कामं झाली नसल्याने मनसेकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे.