मुंबई पोलिसांना मिळाले नवे बॉस, जाणून घ्या कोण आहेत हेमंत नगराळे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

NIA ने मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये मुंबई पोलीस दलामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. DGP हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबईचं पोलीस आयुक्तपद सोपवण्यात आलं आहे. तर परमबीर सिंग यांची बदली होमगार्ड विभागात करण्यात आली आहे. सचिन वाझे यांच्यावर आरोप करणाऱ्या विरोधी पक्षाने परमबीर सिंग यांचीही बदली करावी अशी मागणी केली होती.

दरम्यान, मुंबई पोलीस दलाचे नवे आयुक्त हेमंत नगराळे आहेत तरी कोण?? त्यांची आतापर्यंतची पोलीस कारकिर्द कशी राहिलेली आहे हे आपण जाणून घेऊया.

१) हेमंत नगराळे १९८७ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

२) सहावीपर्यंत चंद्रपूरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण, यानंतरचं शिक्षण नागपूरच्या पटवर्धन हायस्कुलमध्ये

३) VRCE नागपूरमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी

ADVERTISEMENT

४) याव्यतिरीक्त नगराळे यांनी फायनान्स मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स डिग्री घेतली आहे. याव्यतिरीक्त नगराळे यांना राष्ट्रपती पोलीस पदक, विशेष सेवा पुरस्कार, आंतरिक सुरक्षा पदक असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.

ADVERTISEMENT

मोठी बातमी: मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची बदली, सचिन वाझे प्रकरण भोवलं

१९८९ ते ९२ या काळात चंद्रपूरच्या नक्षल भागात नगराळे यांचं पहिलं पोस्टींग होतं. यानंतर १९९२ ते ९२ या काळात नगराळे सोलापूरमध्ये DCP या पदावर कार्यरत होते. बाबरी मशिदीच्या पतनानंतर सोलापूर शहरात दंगलीवर नियंत्रण मिळवण्यात नगराळे यांचा मोठा वाटा मानला जातो. १९९४ ते १९९६ या काळात नगराळे रत्नागिरीमध्ये पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत होते. या काळातही नगराळे यांनी एन्रॉन प्रकल्पाशी संबंधित जमिन अधिग्रहाणाचे अनेक मुद्दे हाताळले होते. १९९६ ते ९८ या काळात हेमंत नगराळे यांनी CID विभागात अधिक्षक पदावर काम केलं. या काळात MPSC पेपर लिक, अंजनीबाई गावीत ने केलेलं लहान मुलांची हत्या ही प्रकरणं नगराळे यांनी हाताळली होती.

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषदेत सचिन वाझे प्रकरणावर काय सांगितलं?

यानंतर काळी काळासाठी हेमंत नगराळे यांनी CBI या देशातील सर्वोच्च यंत्रणेतही काम केलं आहे. इथेही नगराळे यांनी आपली चमक दाखवत केतन पारेखचा घोटाळा, माधोपुरा कोऑपरेटीव्ह बँक, हर्षद मेहता केसची चौकशी केली होती.

२००८ च्या काळात हेमंत नगराळे यांना बढती देऊन MSEDCL विभागात Special IGP आणि Director पदावर कार्यरत होते. या विभागातली नगराळे यांनी आपली चमक दाखवून विजचोरीसारख्या प्रकारांवर आळा घालत MSEDCL चं उत्पन्न २५ टक्क्यांनी वाढवून दाखवलं होतं. मुंबईवर झालेल्या 26/11 अतिरेकी हल्ल्यादरम्यान MSEDCL मध्ये कार्यरत असतानाही नगराळे यांनी मैदानावर येऊन चांगली कामगिरी केली होती. रस्त्यावरील अनेक जखमी आणि मृतांना हॉस्पिटलमध्ये पोहचवण्यात नगराळे यांनी मोठी भूमिका बजावली होती. या काळात रस्त्यावर नगराळे यांनी एक RDX ने भरलेली बॅग शोधून काढत तिला सुरक्षित ठिकाणी हलवून बॉम्बनाशक पथकाला याची सूचना दिली होती. ताज हॉटेलमध्ये शिरुन जखमी झालेल्या अनेकांना नगराळे यांनी बाहेर काढलं होतं. प्रशासकीय पातळीवर अनेक प्रकरणांचा यशस्वी तपास करण्याचा अनुभव नगराळे यांच्याकडे आहे. त्यामुळे सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला लागलेला डाग आणि बिघडत चाललेली परिस्थिती नगराळे कशी सांभाळतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT