मुंबईतल्या शाळांना कोरोनानं लावलं टाळं; महापालिकेनं घेतला तडकाफडकी निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाचे वाढते रूग्ण, ओमिक्रॉनचा धोका या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने पहिली ते नववी आणि अकरावी यांचे वर्ग 4 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत बंद केले जाणार आहेत. मुंबई महापालिकेने एक पत्रक काढून यासंदर्भातली माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? अजित पवारांचं साताऱ्यात सूचक वक्तव्य

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढ हा चिंतेचा विषय ठरु लागला होता. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णवाढ असताना मुलांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगितलं जातंय. पहिली ते आठवीच्या शाळा नुकत्याच सुरु झाल्या होत्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मात्र पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी शाळांबाबत अखेर निर्णय घेतलाय. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शाळा या सुरु राहणार आहेत. मात्र शाळांचे ऑफलाईनवर्ग बंद राहणार आहेत.

ADVERTISEMENT

काय म्हटलं आहे मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने?

ADVERTISEMENT

मुंबई महापालिका क्षेत्रातील 10 आणि 12 वीचे वर्ग वगळता अन्य असणाऱ्या सर्व व्यवस्थापन आणि सर्व माध्यमांच्या शाळा प्रत्यक्ष अध्ययनासाठी बंद ठेवून ऑनलाई पद्धतीने सुरू ठेवण्यात येणार आहे.

सद्यस्थितीत जगातील काही देशांमध्ये आणि मुंबई महापालिका क्षेत्रात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूची भर पडली आहे. मुंबईची एकूण लोकसंख्या त्याचप्रमाणे शहरात जगभरातून लोक येत असतात आणि जात असतात. त्यामुळे नव्या व्हेरिएंटचा प्रभाव होऊ नये यासाठी मुंबई महापालिका क्षेत्रातील पहिली ते नववी आणि अकरावी यांच्या शाळा 4 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत.

मुंबईकरांनो काळजी घ्या ! Corona ची तिसरी लाट शहरात दाखल – टास्क फोर्समधील सदस्याची माहिती

विद्यार्थ्यांचे म्हणजेच पहिली ते नववी आणि अकरावीतील मुलांनी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित न राहता आधी सुरू असलेल्या ऑनलाईन पद्धतीने सुरू राहणार आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. ते लसीकरण सुरू राहणार आहे. खासगी शाळाही पात्र असणाऱ्या 15 ते 18 या वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरण करून घेण्यासाठी त्यांना शाळेत बोलवता येईल असंही मुंबई महापालिकेने आपल्या पत्रकात म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT