नागपूरमध्ये काँग्रेस नेत्याकडून भाजप उमेदवाराचा प्रचार

मुंबई तक

– योगेश पांडे गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षविरोधी कारवायांमुळे चर्चेमध्ये असणारे काँग्रेसचे नेते आशिष देशमुख आता पाच ऑक्‍टोबरला होणाऱ्या जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या प्रचार करताना दिसून आले आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर असतानाच काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील सावरगाव सर्कलमधील पार्वतीबाई काळबांडे या भाजपच्या उमेदवार असून, त्यांच्या निवासस्थानी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

योगेश पांडे

गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षविरोधी कारवायांमुळे चर्चेमध्ये असणारे काँग्रेसचे नेते आशिष देशमुख आता पाच ऑक्‍टोबरला होणाऱ्या जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या प्रचार करताना दिसून आले आहेत.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर असतानाच काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील सावरगाव सर्कलमधील पार्वतीबाई काळबांडे या भाजपच्या उमेदवार असून, त्यांच्या निवासस्थानी 25 सप्टेंबर रोजी एक बैठक झाली. या बैठकीमध्ये संपूर्ण निवडणुकीचे नियोजन आणि प्रचार कार्यपद्धती ठरवण्यात आली. या बैठकीला आशिष देशमुख उपस्थित होते.

भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते आशिष देशमुख तेथे पोहोचल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली.

काँग्रेसचे विभागीय बूथ समन्वयक प्रकाश वासू यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितलं की, ‘वारंवार पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या आशिष देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी करावी यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिस्तभंग समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे राज्य प्रभारी एच. के. पाटील यांना पत्र लिहून देशमुख यांची तक्रार केली आहे.’

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या काँगेसचे मंत्री सुनील केदार यांना मंत्रिमंडळातून हटविण्यात यावं, अशी मागणी करणारे पत्र लिहिलेलं होतं. त्यानंतर आता आशिष देशमुख भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी गेल्याचे फोटो नागपूर जिल्ह्यात चांगलेच व्हायरल होत आहेत.

विशेष म्हणजेच काही दिवसांपूर्वी आशिष देशमुख यांना काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीमध्ये महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या देशमुख यांच्यावर काय कारवाई करते, हे बघणे आता महत्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp