धक्कादायक ! नागपुरात महिलेच्या घरी सापडला १२ हजार लिटर पेट्रोलचा अवैध साठा
नागपूर पोलिसांनी शहराच्या सीमेवर असलेल्या खापरी गावाजवळ एका महिलेच्या घरावर धाड मारत १२ हजार लिटर पेट्रोल जप्त केले आहे. या महिलेने आपल्या घरी एका प्रकारे मिनी पेट्रोल पंपच तयार केला होता. पोलिसांनी या प्रकरणात महिलेसह तीन आरोपींना अटक केली आहे. मीना द्विवेदी असं या आरोपी महिलेचं नाव असून तिच्या घरात २५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त […]
ADVERTISEMENT

नागपूर पोलिसांनी शहराच्या सीमेवर असलेल्या खापरी गावाजवळ एका महिलेच्या घरावर धाड मारत १२ हजार लिटर पेट्रोल जप्त केले आहे. या महिलेने आपल्या घरी एका प्रकारे मिनी पेट्रोल पंपच तयार केला होता. पोलिसांनी या प्रकरणात महिलेसह तीन आरोपींना अटक केली आहे.
मीना द्विवेदी असं या आरोपी महिलेचं नाव असून तिच्या घरात २५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पेट्रोल पंपावरील टँकरमधून पेट्रोल चोरी करत ही महिला आपल्या घरी मोठमोठ्या कॅनमध्ये साठवून ठेवायची. बेलतरोडी पोलिसांना याबद्दल माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी छापा मारत आरोपींना अटक केली आहे.
पेट्रोल पंपावरचं पेट्रोल चोरल्यानंतर ही महिला आपल्या साथीदारांच्या मदतीने यात रॉकेल आणि इतर पदार्थ मिसळायची. बाहेर पेट्रोल ११० रुपये लिटर दराने मिळत असताना ही महिला भेसळ केलेलं पेट्रोल आपल्या साथीदारांच्या सहाय्याने ७७ रुपयाने विकायची.