Narendra Giri: BJP विरोधात बोलणाऱ्या संतांच्या हत्या, यूपीत राष्ट्रपती राजवट लावा: पटोले
मुंबई: अखिल भारतीय आखाडा परिषदेचे नरेंद्र गिरी महाराज यांचा संशयास्पद मृत्यूप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि उत्तरप्रदेश सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. भाजप विरोधात बोलणाऱ्या संतांची उत्तर प्रदेशमध्ये हत्या होत आहे. त्यामुळे तिथे आता राष्ट्रपती राजवट लागू केली जावी. असं नाना पटोले यावेळी म्हणाले. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उत्तरप्रदेशमध्ये […]
ADVERTISEMENT

मुंबई: अखिल भारतीय आखाडा परिषदेचे नरेंद्र गिरी महाराज यांचा संशयास्पद मृत्यूप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि उत्तरप्रदेश सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. भाजप विरोधात बोलणाऱ्या संतांची उत्तर प्रदेशमध्ये हत्या होत आहे. त्यामुळे तिथे आता राष्ट्रपती राजवट लागू केली जावी. असं नाना पटोले यावेळी म्हणाले. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उत्तरप्रदेशमध्ये जे संत भाजपचं वास्तव मांडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांची हत्या केली जात आहे. त्यामुळे आता तेथील परिस्थिती खूपच भयानक आहे. असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे. जाणून घेऊयात या प्रकरणी नाना पटोले यांनी भाजपवर नेमके काय आरोप केले आहेत.
‘यूपीमध्येच सगळ्यात जास्त संतांच्या हत्या’
‘महाराष्ट्रात अशाप्रकारे एखाद्या संताची हत्या झाली असती तर केवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं असतं. संतांची सुरक्षा महाराष्ट्रात नाही, असं दाखवण्याची व्यवस्था झाली असती. आता.. आता यूपीमध्ये काय झालं. यूपीमध्येच सगळ्यात जास्त संतांच्या हत्या होतात आणि त्या देखील भाजपच्याच काळात.’