Mumbai : ‘आता संयम आणि सौजन्याची ऐशी तैशी…’; राणा विरुद्ध शिवसेना संघर्षावर कोण काय म्हणालं?
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान पठणाचा इशारा दिल्यानंतर मुंबईत बरंच राजकीय गोंधळ उडाला. राणा दाम्पत्याचं घरं असलेल्या भागात शिवसैनिक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत असून, शिवसेना नेत्यांनी आक्रमक भूमिका मांडली. तर भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने राणा दाम्पत्यावर टीका केली आहे. मुंबईत हनुमान […]
ADVERTISEMENT

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान पठणाचा इशारा दिल्यानंतर मुंबईत बरंच राजकीय गोंधळ उडाला. राणा दाम्पत्याचं घरं असलेल्या भागात शिवसैनिक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं.
याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत असून, शिवसेना नेत्यांनी आक्रमक भूमिका मांडली. तर भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने राणा दाम्पत्यावर टीका केली आहे.
मुंबईत हनुमान चालीसा पठणावरून सुरू असलेल्या गोंधळावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत हल्ला चढवला. “आता बास झालं. (Enough is Enough!) आता संयम आणि सौजन्याची ऐशी तैशी… जय महाराष्ट्र!!,” असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी इशारा दिला आहे.
Enough is Enough!
आता संयम आणि सौजन्याची ऐशी तैशी…
जय महाराष्ट्र!!— Sanjay Raut (@rautsanjay61) April 23, 2022
नागपुरात माध्यमांशी बोलताना राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. “बायकांच्या पाठीमागून वार करणं बंद करा. सात जन्म घ्यावी लागतील भाजपला आम्हाला पुरुन उरायला… केरळ, पश्चिम बंगालमध्ये भाजपला तिथले लोकं पुरुन उरले होते… कायदा आणि सुव्यवस्था बिघण्याचं काम भाजपचीच लोकं करत आहेत..त्यामुळे हा सगळा प्रकार बंद करा,” असं राऊत म्हणाले.