Sharad Pawar : ‘ED कुणाच्या मागे कशी लागेल काही सांगताच येत नाही’
ED कुणाच्या मागे कशी लागेल हे सांगताच येत नाही असा खोचक टोला लगावत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टीका केली आहे. ईडीच्या कारवाया म्हणजे राज्याच्या अधिकारांवर गदा आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाच्या काही सदस्यांवर ईडीची करावाई केली जाते आहे. गेल्या दोन-तीन वर्षात ही नवीन यंत्रणा लोकांना ठाकऊ […]
ADVERTISEMENT

ED कुणाच्या मागे कशी लागेल हे सांगताच येत नाही असा खोचक टोला लगावत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टीका केली आहे. ईडीच्या कारवाया म्हणजे राज्याच्या अधिकारांवर गदा आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाच्या काही सदस्यांवर ईडीची करावाई केली जाते आहे. गेल्या दोन-तीन वर्षात ही नवीन यंत्रणा लोकांना ठाकऊ झाली आहे. अकोल्यातून शिवसेनेच्या खासदार असलेल्या भावना गवळी आल्या होत्या. त्यांच्या ३-४ शिक्षण संस्था आहेत. एक दुसरी छोटी संस्था आहे. त्याचा व्यवहारही 20-25 कोटींच्या घरात आहे तरीही ईडीने त्रास दिल्याचं त्यांनी सांगितलं असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात इतक्या ईडीच्या केसेस तुम्ही ऐकल्या आहेत का?
महाराष्ट्रात इतक्या वर्षांत इतक्या ईडीच्या केसेस कधी ऐकल्या आहेत का तुम्ही? एकनाथ खडसे, अनिल देशमुख, प्रताप सरनाईक अशा अनेक जणांच्या विरोधात केसेस आहेत. हल्ली विरोधकांना त्रास देण्यासाठी याचा साधन म्हणून वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ठीक आहे. काही काळ येतो, नंतर जातो. जेव्हा हा काळ जाईल, तेव्हा यात दुरुस्ती होईल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
ईडीच्या कारवायांचा मुद्दा आपण संसदेत मांडणार असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. जिथे गैरव्यवहार झाला आहे त्यासाठी आपल्या देशात कमिशन आहेत. त्याच्याकडे जाऊन तक्रार केली जाऊ शकते. राज्य सरकारचं गृहखातं असताना ईडीने त्या संस्थांमध्ये जाऊन हस्तक्षेप करणं हे एका अर्थाने राज्याच्या अधिकारांवर गदा आणल्यासारखंच आहे. याती अनेक उदाहरणं हल्ली पाहण्यास मिळत आहेत या गोष्टी मला योग्य वाटत नाही. संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर या गोष्टी मांडणार असल्याचंही पवार यांनी स्पष्ट केलं.