हेरगिरीच्या संशयावरून NIA कडून बुलडाण्यात छापेमारी, 24 वर्षीय तरुणाला घरातून घेतलं ताब्यात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जका खान, बुलडाणा: हेरगिरीच्या संशयावरुन राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने बुलडाणा जिल्ह्यासह गुजरातमधील विविध ठिकाणी छापे मारले आहेत. दहशतवादी हल्ले करण्यासाठी संवेदनशील माहिती गोळा करण्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील रायपूर पोलीस ठाणे हद्दीतील ग्राम सोनेवाडी येथून काल 24 मार्च रोजी सकाळी NIA ने एका 24 वर्षीय युवकास ताब्यात घेतले आहे. या अगोदर देखील याच तपासात NIA ची टीम बुलडाणा जिल्ह्यात येऊन गेल्याची गोपनीय माहिती समोर आली आहे.

दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी एनआयएकडून आंध्र प्रदेशमध्ये जानेवारी 2020 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी बुलडाणा आणि गुजरातमधील गोधरा येथील 4 ठिकाणी छापे मारले होता. संशयास्पद सिमकार्ड, कागदपत्रे व इतर डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी पाकिस्तानी गुप्तहेरांनी विशाखापट्टणम, मुंबई आणि गोव्यातील आरोपींसोबत कट रचल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघडकीस आले आहे. याच प्रकरणाच्या तपासात NIA चे पथक बुलढाणा जिल्ह्यात आले व त्यांनी सोनेवाडी येथून काल गुरुवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास स्थानिक पोलिसांच्या मदतीने एका 24 वर्षीय युवकास त्याच्या घरातून ताब्यात घेतले व त्याचा मोबाइलही जप्त केल्याचे समजते.

बुलडाणा जिल्ह्यात आलेला एनआयएचा पथक हैद्राबाद येथील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

दहशतवादी मोड्युलचं मुंबई कनेक्शन, ड्रायव्हर म्हणून वावरत होता दहशतवादी समीर

ADVERTISEMENT

दरम्यान, काही महिन्यापूर्वी काही दहशतवादी मुंबईतून देखील अटक करण्यात आले होते. पाकिस्तानच्या एका मोठ्या दहशतवादी मोड्युलचा दिल्ली पोलीस आणि युपी एटीएसने पर्दाफाश केला होता. या प्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली होती. यापैकी एकाला मुंबईतून अटक करण्यात आली होती. मुंबईतून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव समीर असं असून तो ड्रायव्हर म्हणून मुंबईत काम करत होता. पाकिस्तानच्या ISI या अतिरेकी कारवाया करणाऱ्या संघटनेने या सगळ्यांना फंडिंग केलं होतं.

मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड ऑपरेटिव्ह जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालियाच्या कुटुंबीयांची कसून चौकशी केली होती. त्यामध्ये समीर कालिया 12 सप्टेंबरपासून 2021 गायब होता आणि 14 तारखेला त्याला अटक झाली तेव्हाच ही बाब समोर आली होती. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार समीर कालिया मुंबईहून दिल्लीला जात असताना कोटा या ठिकाणाहून त्याला अटक करण्यात आली होती.

समीरची पत्नी आणि मुली यांची मुंबईच्या धारावी पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समीरच्या पत्नीने पोलिसांना सांगितलं होतं की, समीर दहशतवादी असेल असं तिला कधीही वाटलं नव्हतं. कारण समीर ड्रायव्हर म्हणून मुंबईत काम करतो. समीरला दहशतवादी म्हणून अटक झाल्यानंतर आम्हालाच आश्चर्याचा धक्का बसला आहे असं त्याच्या पत्नीने पोलिसांना सांगितलं होतं.

समीर माझ्याशी कधी मोठ्या आवाजात बोलतही नाही तो दहशतवादी कारवायांमध्ये कसा सहभागी असेल? असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं असं त्याच्या पत्नीने सांगितल्यांचं पोलीस सूत्रांनी स्पष्ट केलं होतं.

कुणी MBA तर कुणी शेतकरी, जाणून घ्या कोण आहेत दिल्ली पोलिसांनी अटक केलेले सहा संशयित दहशतवादी?

समीर आणि त्याचं कुटुंब मुंबई सेंट्रलच्या एमजी रोड भागात असलेल्या कलाबखार भागातल्या झोपडीत वास्तव्य करतं. समीरला दोन मुली आहेत. पोलिसांनी आता समीरच्या कुटुंबीयांसोबतच त्याच्या शेजाऱ्यांचीही चौकशी सुरू केली आहे. समीर दहशवादी आहे हे समजल्यावर त्याच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनाही आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमने समीरला भारतल्या विविध ठिकाणी IED, शस्त्रं आणि हातबॉम्बची डिलिव्हरी करण्याचं काम दिलं होतं. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार अनिसने सणासुदीच्या काळात दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये घातपात आणि हत्या घडवून आणायच्या असा कट आखला होता. मात्र पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे त्याचे मनसुबे उधळले गेले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT