भर चौकात खुन होत नाही तोपर्यंत….पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या विधानाची पिंपरी-चिंचवडमध्ये चर्चा
पिंपरी-चिंचवड शहरांत गेल्या काही दिवसांमध्ये होत असलेल्या खुनाच्या घटनांमुळे पोलीस यंत्रणेचा काही वचक उरला आहे की नाही असा प्रश्न नागरिकांमध्ये विचारला जात आहे. परंतू शहराचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी या घटनांविषयी अजब वक्तव्य केलं आहे. जोपर्यंत सार्वजनिक ठिकाणी, भर चौकात असे गुन्हे घडत नाहीत तोपर्यंत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय असं म्हणता येणार नाही, असं […]
ADVERTISEMENT

पिंपरी-चिंचवड शहरांत गेल्या काही दिवसांमध्ये होत असलेल्या खुनाच्या घटनांमुळे पोलीस यंत्रणेचा काही वचक उरला आहे की नाही असा प्रश्न नागरिकांमध्ये विचारला जात आहे. परंतू शहराचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी या घटनांविषयी अजब वक्तव्य केलं आहे.
जोपर्यंत सार्वजनिक ठिकाणी, भर चौकात असे गुन्हे घडत नाहीत तोपर्यंत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय असं म्हणता येणार नाही, असं विधान कृष्णप्रकाश यांनी केलं आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या ३ दिवसांमध्ये ६ हत्येचे गुन्हे घडले आहेत. याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत कृष्णप्रकाश यांना कायदा-सुव्यवस्थेविषयी प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना कृष्णप्रकाश यांनी, “मागील वर्षांच्या तुलनेत खुनाचे गुन्हे कमी झाले आहेत. परंतू जोपर्यंत सार्वजनिक ठिकाणी, सर्वांसमोर भरचौकात असे प्रकार घडत नाहीत तोपर्यंत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे हा प्रश्नच उद्भवू शकत नाही”, असं विधान केलं.
रागाच्या भरात, अनैतिक संबंधातून, आर्थिक कारणातून होणारे गुन्हे वैयक्तिक स्वरूपाचे गुन्हे असतात. त्याची गणना सामाजिक गुन्ह्यात होत नाही. त्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण होण्याचे कारण नाही. एकाच माणसाने दहा लोकांना मारले असेल तर भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. पण वैयक्तिक गुन्ह्यातून भीतीचे वातावरण निर्माण होत नाही असा तर्क कृष्णप्रकाश यांनी मांडला.