कुख्यात गुंड ‘अंडापाव’ला गुजरातमधून अटक, उल्हासनगर क्राईम ब्रँचने ठोकल्या बेड्या
उल्हासनगर: खुनाचा प्रयत्न आणि अल्पवयीन मुलीचं अपहरण करून पळवून नेल्याची घटना उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपीवर अपहरण आणि पोक्सो अंतर्गत बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेचा तपास उल्हासनगर क्राईम ब्रँच करत होती. अखेर गुप्त माहितीदारकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बडोदा येथून आरोपी संतोष सायअण्णा उर्फ अंडापावला अटक केली […]
ADVERTISEMENT

उल्हासनगर: खुनाचा प्रयत्न आणि अल्पवयीन मुलीचं अपहरण करून पळवून नेल्याची घटना उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपीवर अपहरण आणि पोक्सो अंतर्गत बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचा तपास उल्हासनगर क्राईम ब्रँच करत होती. अखेर गुप्त माहितीदारकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बडोदा येथून आरोपी संतोष सायअण्णा उर्फ अंडापावला अटक केली आहे. आरोपी संतोषवर आतापर्यंत दरोडा, खुनाचा प्रयत्न आणि दंगल यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलावर गुन्हेगार संतोष बाबू सायअण्णा उर्फ अंडापाव याने प्राणघातक हल्ला केला होता आणि त्या दिवसांपासूनच तो फरार झाला होता. नंतर या गुंडाने एका अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं होतं. याप्रकरणी पोलीस आणि उल्हासनगर क्राईम ब्रँच टीम या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत होती.
पोलिसांनी सुरूवातीला मिळालेल्या माहितीवरून उत्तरप्रदेश मध्ये जाऊन शोध घेतला होता. परंतु हाती काही लागलं नाही. पुन्हा क्राईम ब्रँचच्या टीमला गुप्त बातमीदरकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुजरात राज्यातील बडोदा शहरातून संतोष उर्फ अंडापावला बेड्या ठोकल्या आणि अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका केली.