खळबळजनक प्रकरण! एका ‘योगी’च्या मनाप्रमाणे चित्रा रामकृष्ण घ्यायच्या NSE चे निर्णय
देशातील राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (National Stock Exchange) माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांनी 20 वर्ष एका हिमालयातील योगीच्या सांगण्यानुसार निर्णय घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भारतीय सुरक्षा आणि नियमन मंडळ म्हणजेच सेबीकडून (Securities and exchange board of India) हा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. नॅशनल स्टॉच एक्सचेंजच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि […]
ADVERTISEMENT

देशातील राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (National Stock Exchange) माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांनी 20 वर्ष एका हिमालयातील योगीच्या सांगण्यानुसार निर्णय घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भारतीय सुरक्षा आणि नियमन मंडळ म्हणजेच सेबीकडून (Securities and exchange board of India) हा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.
नॅशनल स्टॉच एक्सचेंजच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चित्रा रामकृष्ण या हिमालयातील योगीच्या सांगण्यानुसार निर्णय होत्या. सेबीने रामकृष्ण आणि इतर अन्य अधिकाऱ्यांविरुद्ध दिलेल्या अंतिम आदेशात या गोष्टीचा खुलासा केला आहे.
चित्रा रामकृष्ण यांनी त्यांच्या कार्यकाळात एका हिमालयातील योगीच्या सांगण्यावरूनच आनंद सुब्रमण्यम यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि व्यवस्थापकीय संचालकाच्या सल्लागार पदावर नियुक्त केले होतं, असं सेबीने म्हटलं आहे. चित्रा रामकृष्ण यांनी सुब्रमण्यम यांना मनमर्जीप्रमाणे अनेकवेळा पगारवाढ दिली. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कामाच्या मूल्याकंनाचे कोणतेही पुरावे नाहीत, असं सेबीने आदेशात म्हटलं आहे.
सेबीकडून शुक्रवारी हा आदेश काढण्यात आला. चित्रा रामकृष्ण यांनी आर्थिक आणि व्यावसायिक योजना, आर्थिक परिमाण आणि इतर अन्य गोपनीय माहिती त्या योगीला दिली. त्याचबरोबर एनएसईमधील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसंदर्भातही त्यांनी योगीशी चर्चा केली.