Nykaa IPO: पन्नाशीत सुरु केला बिजनेस, 'ही' बिझनेसवुमन आज आहे अब्जावधी रुपयांची मालकीण

Nykaa IPO: Nykaa चं आयपीओ शेअर मार्केटमध्ये आल्यानंतर त्याच्या संस्थापिका फाल्गुनी नायर यांची संपत्ती अब्जावधी रुपयाने वाढली आहे.
Nykaa IPO: पन्नाशीत सुरु केला बिजनेस, 'ही' बिझनेसवुमन आज आहे अब्जावधी रुपयांची मालकीण
Nykaa IPO Business started in the fifties businesswoman today owns billions of rupees

मुंबई: ब्यूटी ई-कॉमर्स कंपनी Nykaa IPO च्या जबरदस्त यशामुळे कंपनीच्या प्रमोटर फाल्गुनी नायर यांचे सर्व बाजूंनी कौतुक होत आहे. Nykaa ची मूळ कंपनी FSN E-Commerce Ventures Ltd ला शेअर बाजारात चांगली लिस्टिंग मिळाली आहे आणि त्यामुळे फाल्गुनी प्रचंड श्रीमंत झाल्या आहेत. बायोकॉनचे किरण मुझुमदार शॉ, हॅवेल्सचे अनिल राय गुप्ता यांसारख्या अनेक उद्योगपतींपेक्षाही त्या श्रीमंत झाल्या आहेत. त्यामुळे श्रीमंतांच्या यादीत त्या वर आल्या आहेत.

फाल्गुनी नायर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या ट्रस्ट ऑफिसच्या नायकामध्ये 50 टक्क्यांहून अधिक भागीदारी आहे. त्यांची सामूहिक संपत्ती आता 54,831 कोटी रुपये (सुमारे 7.5 अब्ज डॉलर) झाली आहे. या IPOपूर्वी नायर आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्ती केवळ 27,962 कोटी रुपये होती. नायकाच्या प्रमोटर्समध्ये फाल्गुनी नायर यांचं फॅमेली ट्रस्ट, त्यांचा पती संजय नायर यांचं फॅमेली ट्रस्ट, त्यांचा मुलगा, मुलगी आणि आई रश्मी मेहता यांच्या ट्रस्टचाही समावेश आहे.

अशाप्रकारे आता नायर कुटुंब संपत्तीच्या बाबतीत Havells चे अनिल राय गुप्ता, Motherson Sumi चे विवेक चंद सहगल, Marico चे हर्ष मारीवाला, आयशरचे (Eicher) सिद्धार्थ लाल आणि टोरेंट फार्माचे (Torrent Pharma) समीर मेहता यांच्यापेक्षा पुढे आहे. नायर कुटुंबाने या प्रकरणात बायोकॉनचे (Biocon) किरण मुझुमदार शॉ आणि Apollo Hospitals च्या रेड्डी बहिणींनाही मागे टाकले आहे.

आयपीओनंतर आता या कंपनीतील नायर कुटुंबीयांच्या ट्रस्टची हिस्सेदारी 22.04 टक्क्यांवर आली आहे. त्यांच्या पतीच्या ट्रस्टची 23.37 टक्के भागीदारी आहे. Nykaa सुमारे 1,04,360.85 कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह भारतातील टॉप 100 लिस्टेड कंपन्यांपैकी एक बनली आहे.

फाल्गुनी नायर यांना आता Bloomberg Billionaires Index मध्ये स्थान मिळाले आहे. आतापर्यंत भारतातील केवळ सहा महिलांना हे यश मिळाले आहे. ब्लूमबर्गने त्यांचे वर्णन भारतातील सर्वात श्रीमंत महिला उद्योगपती म्हणून केले आहे. इनवेस्टमेंट बँकर म्हणून फायदेशीर कारकीर्द सोडून फाल्गुनी नायरने 2012 मध्ये नायका या ब्रँडची सुरुवात केली होती.

1600 हून अधिक लोकांच्या टीमचे नेतृत्व करत, फाल्गुनीने एक ब्यूटी आणि लाइफस्टाइल रिटेल साम्राज्य Nykaa चं निर्माण केलं आहे, जे स्वतःच्या खाजगी लेबलसह 1500+ ब्रँड्सच्या पोर्टफोलिओसह भारतातील आघाडीचे ब्यूटी रिटेलर म्हणून उदयास आले आहे.

Nykaa IPO Business started in the fifties businesswoman today owns billions of rupees
Nykaa IPO: फाल्गुनी नायरांच्या संपत्तीत एका दिवसात तब्बल 26,869 कोटींची वाढ

फाल्गुनी नायर यांनी वयाच्या 50 व्या वर्षी हा बिझनेस सुरु केला. त्यानंतर त्यांनी 2014 साली Nykaa चं पहिलं फिजिकल स्टोअर सुरू केले होते. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत FSN ई-कॉमर्सची देशभरातील 40 शहरांमध्ये 80 स्टोअर्स आहेत. Nykaa मध्ये ब्यूटी आणि पर्सनल केअरसाठी एक अॅप आहे. याशिवाय Nykaa Fashion देखील आहे. जिथे कपडे, अॅक्सेसरीज, फॅशनशी संबंधित उत्पादने आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in