Omicron cases : देशातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 415 वर; महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
नव्या वर्षात कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट पुन्हा एकदा डोकेदुखी ठरणार असल्याची चिन्हं दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून ओमिक्रॉन व्हेरिएंट देशात हातपाय पसरवताना दिसत असून, देशातील एकूण रुग्णसंख्या 415 वर पोहोचली आहे. निर्बंधांचा वेढा पडलेल्या महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब म्हणजे देशातील सर्वाधिक ओमिक्रॉन रुग्ण राज्यात आढळून आले आहेत. देशात ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या 415 वर पोहोचली […]
ADVERTISEMENT

नव्या वर्षात कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट पुन्हा एकदा डोकेदुखी ठरणार असल्याची चिन्हं दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून ओमिक्रॉन व्हेरिएंट देशात हातपाय पसरवताना दिसत असून, देशातील एकूण रुग्णसंख्या 415 वर पोहोचली आहे. निर्बंधांचा वेढा पडलेल्या महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब म्हणजे देशातील सर्वाधिक ओमिक्रॉन रुग्ण राज्यात आढळून आले आहेत.
देशात ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या 415 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे 415 पैकी 115 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर उर्वरित रुग्ण उपचाराधीन आहेत. आतापर्यंत देशात आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात म्हणजे 108 रुग्ण आढळू आले आहेत.
Omicron : महाराष्ट्रात दिवसभरात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 20 नवे रूग्ण, एकूण संख्या 108
महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमाकांवर राजधानी दिल्ली आहे. दिल्लीतील रुग्णसंख्येचा आकडा 79 वर पोहोचला आहे. तिसऱ्या क्रमांकांवर गुजरात असून, तिथे 43 रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर तेलंगानात 38, केरळात 37, तामिळनाडूमध्ये 34 रुग्ण आढळून आले आहेत.