Omicron symptom: ओमिक्रॉनच्या लक्षणांमध्ये आणखी एकाची भर, नका करू दुर्लक्ष
covid omicron variant symptoms।ओमिक्रॉन व्हेरिएंटची लक्षणे काय? India Today

Omicron symptom: ओमिक्रॉनच्या लक्षणांमध्ये आणखी एकाची भर, नका करू दुर्लक्ष

Omicron symptom : जगभरातील शास्त्रज्ञ ओमिक्रॉनवर नवीन माहिती गोळा करत आहेत. WHO ने एक चेतावणी देखील दिली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) हा कोरोना व्हायरसच्या (coronavirus) कोणत्याही व्हेरिएंटपेक्षा वेगाने पसरतो. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

यामुळेच आरोग्य तज्ज्ञ लोकांना कोणत्याही प्रकारच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला देत आहेत. डॉक्टरांनी Omicron चे एक असामान्य लक्षणही नोंदवलं आहे. जे सहसा कोणाच्याही लक्षात येत नाही.

Omicron चे असामान्य लक्षण (Unusual symptom of Omicron): कोरोनाची सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे चव आणि सुगंध कमी होणे, ताप, घसा खवखवणे आणि अंगदुखी. तथापि, ओमिक्रॉनच्या प्रत्येक रुग्णामध्ये ही लक्षणे आढळत नाहीत.

आत्तापर्यंतच्या डेटाच्या आधारे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, केवळ 50% कोरोना रुग्णांना ताप, कफ आणि चव नसल्यासारखे वाटत आहे. तथापि, ओमिक्रॉनच्या बहुतेक रुग्णांमध्ये, एक विशिष्ट लक्षण निश्चितपणे आढळून येते आणि ते म्हणजे भूक न लागणे (loss of appetite).

जर तुम्हाला इतर काही लक्षणांसह भूक लागत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि त्यानंतर कोव्हिड चाचणी करून घ्यावी.

भारतात ओमिक्रॉनचे रुग्ण: भारतात आतापर्यंत ओमिक्रॉनचे 1700 रुग्ण (omicron cases in india) सापडले आहेत. दरम्यान, भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक्स कंसोर्टियम (INSACOG) चे म्हणणे आहे की, भारतातील Omicron चा संसर्ग दर, रोगप्रतिकार शक्ती आणि तीव्रता यावर आतापर्यंत कोणतेही स्पष्ट पुरावे उपलब्ध नाहीत.

INSACOG ने आपल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, डेल्टा व्हेरिएंट अजूनही जगभरात चिंतेचं कारण आहे. असं असताना ओमिक्रॉन देखील वेगाने वाढत आहे.

INSACOG म्हणाले, 'दक्षिण आफ्रिकेत रुग्ण वाढत आहेत. मात्र, रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे. यूके जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये असे आढळून आले आहे की, S-gene टार्गेट अयशस्वी झाल्यामुळे ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

त्यामुळे डेल्टा व्हेरिएंटला देखील झपाट्याने वाढण्याची संधी मिळणार आहे. कंसोर्टियम ने सांगितले की, ओमिक्रॉन सौम्य असू शकते असे काही संकेत आहेत. परंतु याबद्दल पुरेसा डेटा उपलब्ध नाही.

covid omicron variant symptoms।ओमिक्रॉन व्हेरिएंटची लक्षणे काय?
Corona : काळजीत भर! मुंबईत 8082 नव्या रूग्णांची नोंद, दिवसभरात दोन मृत्यू

Omicron वर लसीचा प्रभाव: केंद्र सरकारचं म्हणणं आहे की, सध्याच्या लसीचा Omicron व्हेरिएंटवर परिणाम होणार नाही असा कोणताही पुरावा नाही. तथापि, लसीमुळे, अँटीबॉडीज आणि सेल्युलर प्रतिकारशक्ती निर्माण होते. ज्यामुळे चांगले संरक्षण मिळते.

म्हणून, लस गंभीर रोगापासून संरक्षण करते याचा पूर्ण पुरावा आहे. म्हणूनच प्रत्येकाने लसीचे दोन्ही डोस नक्कीच घेतले पाहिजेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in