Omicron आणखी २३ देशांमध्ये पसरला, व्हेरिएंटचा आणखी प्रसार होऊ शकतो – WHO ची माहिती
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे सध्या जगाची झोप उडाली आहे. त्यातच जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने चिंतेत भर घालणारी एक माहिती दिली आहे. WHO चे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयेसू यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत किमान २३ देशांमध्ये नवीन व्हेरिएंटचा प्रसार झाला आहे. आगामी काळात हा प्रसार आणखीन वाढू शकतो असंही गेब्रेयेसू म्हणाले. दरम्यान नवीन […]
ADVERTISEMENT

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे सध्या जगाची झोप उडाली आहे. त्यातच जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने चिंतेत भर घालणारी एक माहिती दिली आहे. WHO चे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयेसू यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत किमान २३ देशांमध्ये नवीन व्हेरिएंटचा प्रसार झाला आहे. आगामी काळात हा प्रसार आणखीन वाढू शकतो असंही गेब्रेयेसू म्हणाले.
दरम्यान नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनेही आता सावध पावलं उचलत बाहेरील देशांतून येणाऱ्या नागरिकांसाठी निर्बंध कडक केले आहेत. जोखीम असलेल्या (At Risk) देशांमधून काल दिवसभरात भारतात विविध राज्यात ११ आंतरराष्ट्रीय उड्डाणं आली आहेत. ज्यात ३ हजार ४७६ प्रवासी होते. या सर्व प्रवाशांच्या RTPCR चाचण्या करण्यात आल्या आहेत. ज्यात ६ प्रवासी कोविड पॉजिटीव्ह असल्याचं कळतंय.
बाधित रुग्णांचे नमुने हे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले असून यानंतर त्यांना ओमिक्रॉनची लागण झालेली आहे की नाही हे समजेल.
The emergence of the #Omicron variant has understandably captured global attention. At least 23 countries from five of six WHO regions have now reported cases of Omicron, and we expect that number to grow: WHO chief Tedros Adhanom Ghebreyesu
(File photo) pic.twitter.com/O40TbxYc0Q
— ANI (@ANI) December 1, 2021
दरम्यान ज्या दक्षिण आफ्रिकेत हा ओमिक्रॉन व्हेरिएंट पहिल्यांदा आढळला गेला. तिकडेही कोरोनाच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात दक्षिण आफ्रिकेत कोविड रुग्णांची संख्या ५७१ % नी वाढली आहे.