Gudi padwa: डोळ्याची पारणे फेडणार दृश्य! विठूरायाला फुलांची आरास, असं सजले विठ्ठल मंदिर

मुंबई तक

मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्यातील अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सजावटी करण्यात आलीये. या प्रमुख तीर्थाक्षेत्रांपैकी एक असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात फुलांची आरास करत आकर्षक सजावट करण्यात आली. हिंदू धर्मात गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने सर्व विठ्ठल भक्तांसाठी महत्त्वाचा दिवस समजला जातो. देवाचा गाभारा, सोळा खांबी मंडप, चौखंभी मंडप रंगबरंगी फुलांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्यातील अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सजावटी करण्यात आलीये.

या प्रमुख तीर्थाक्षेत्रांपैकी एक असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात फुलांची आरास करत आकर्षक सजावट करण्यात आली.

हिंदू धर्मात गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने सर्व विठ्ठल भक्तांसाठी महत्त्वाचा दिवस समजला जातो.

देवाचा गाभारा, सोळा खांबी मंडप, चौखंभी मंडप रंगबरंगी फुलांनी सजवण्यात आला.

यामध्ये शेवंतीची 450 किलो फुलं, गुलाबी कन्हेरीची 40 किलो फुलं, अस्टर 40 किलो, झेंडू 100 किलो, गुलाब 50 गड्डी अशा फुलांचा वापर करण्यात आला आहे.

ही सजावट पुणे जिल्ह्यातील रांजणगावचे भाविक नानासाहेब दिनकरराव पाचनकर यांच्या वतीने करण्यात आली आहे.

तसंच आजपासून विठुरायाच्या तुळशी अर्चन पूजेस सुरूवात होणार आहे.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

हे वाचलं का?

    follow whatsapp