Raj Thackeray: जेव्हा राज ठाकरे शिवशाहीर बाबासाहेबांसमोर नतमस्तक होतात..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (BabaSaheb Purandare) यांनी आज (29 जुलै 2021) 100 व्या वयात (100th Birthday) पदार्पण केलं आहे. याच निमित्ताने मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुण्यातील (Pune) निवासस्थानी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळेस राज ठाकरेंनी बाबासाहेबांना शुभेच्छा तर दिल्याच मात्र त्यावेळी ते त्यांच्यासमोर नतमस्तक देखील झाले. बाबासाहेब पुरंदरे यांना शुभेच्छा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवून त्यांचे आशीर्वाद घेतले.

बाबासाहेब पुरंदरे यांचा शंभरावा वाढदिवस असल्याने स्वत: राज ठाकरे हे यांनी पुण्यात बाबासाहेबांची भेट घेतली. यावेळी शाल, पगडी आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांनी बाबासाहेबांचा सत्कार केला. तसंच त्यानंतर बाबासाहेबांच्या पायावर डोकं ठेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यानंतर सहस्त्र दिव्यांनी बाबसाहेबांना ओवाळण्यात देखील आलं.

बाबासाहेब पुरंदरे आणि ठाकरे कुटुंबीयांचे फार जुने संबंध आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि बाबासाहेब पुरंदरे यांची अतिशय घनिष्ठ मैत्री होती. बाळासाहेब ठाकरे आणि बाबासाहेब पुरंदरे यांची खूप वर्षापासून मैत्री असल्याने अनेकदा बाबासाहेब हे देखील ‘मातोश्री’वर कायम येत असत. त्यामुळे सुरुवातीच्या काळापासूनच राज ठाकरे हे बाबासाहेबांना पाहत आले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बाबासाहेबांच्या एकूण कर्तृत्वाची छाप राज ठाकरे यांच्या मनावर कायम आहे आणि त्यामुळेच ते त्यांना गुरुतुल्य मानतात. म्हणून राज ठाकरे हे जेव्हा कधी पुण्यात येतात तेव्हा ते सर्वात आधी बाबासाहेब पुरंदरेंची भेट घेतात. राज ठाकरे यांनी बाबासाहेबांची रायगडावर एक विशेष मुलाखत देखील घेतली होती.

ADVERTISEMENT

बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्याला काही प्रमाणात विरोध दर्शवला गेला होता. त्यावेळी विरोध दर्शविणाऱ्यांविरोधात राज ठाकरे यांनी अतिशय आक्रमक अशी भूमिका घेतली होती. जेव्हा बाबासाहेब पुरंदरेंना हा पुरस्कार बहाल करण्यात आला त्यानंतर राज ठाकरे यांनी बाबासाहेबांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

ADVERTISEMENT

बाबासाहेब पुरंदरेंनी 100 व्या वाढदिवसानिमित्त साधला माध्यमांशी संवाद

बाबासाहेब पुरंदरेंनी 100 व्या वाढदिवसानिमित्त साधला माध्यमांशी संवाद साधत अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.

‘छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर लोकांचं आज एवढं प्रेम आहे की, आज तीनशे वर्ष होऊन गेली तरीही त्या महापुरुषाला आम्ही एकही दिवस विसरत नाही. शिवाजी महाराज की जय म्हटल्याशिवाय आमच्या मुलांचं लहानपण साजरं होतं नाही. शिवाजी महाराजांचं चित्र लावल्याशिवाय आमच्य घराची भिंत सुंदर दिसत नाही.’

‘आज मी शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे. पण मी त्याकरिता काही वेगळं केलं का? तर काही नाही. फक्त एक म्हणजे मला कसलंही व्यसन नाही. मी असे शेकडो लोकं पाहिली आहेत की त्यांना कसलंही व्यसन नाही. मला वाटतं त्या विधात्याची इच्छा होती म्हणूनच मी शंभर वर्ष जगलो.’

Babasaheb Purandare: ‘त्या’ महापुरुषाला एकही दिवस विसरत नाही’, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचे 100 व्या वर्षात पदार्पण

‘मला आणखी दोन-तीन वर्ष मिळाली तरी आजारी पडू देऊ नको एवढीच ईश्वराकडे माझी इच्छा आहे. या शंभर वर्षाच्या कालखंडात मी खूप शिकलो. शिकवण्याचा आव कधी मी आणला नाही.’

‘छत्रपती शिवाजी महाराज हा समजून घेण्याचा खूप मोठा विषय आहे. त्यामुळे अद्यापही त्यांच्याविषयी खूप गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. वयाची 99 वर्ष मी आनंदी आहे पण समाधानी मात्र नाही.’ असं बाबासाहेब पुरंदरे म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT