दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीत एकाचा मृत्यू
मंगळवारी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. आता त्याच रॅलीत एकाचा ट्रॅक्टर उलटून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी लावलेले बॅरिकेड तोडून ट्रॅक्टर रॅलीतील आंदोलकांनी जेव्हा शहरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुरांचा मारा केला तसेच लाठीचार्ज केला. दिल्लीच्या पंडित दिन दयाल उपाध्याय मार्गावर ट्रॅक्टर पलटी होऊन त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी केलेलं […]
ADVERTISEMENT

मंगळवारी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. आता त्याच रॅलीत एकाचा ट्रॅक्टर उलटून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी लावलेले बॅरिकेड तोडून ट्रॅक्टर रॅलीतील आंदोलकांनी जेव्हा शहरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुरांचा मारा केला तसेच लाठीचार्ज केला.
दिल्लीच्या पंडित दिन दयाल उपाध्याय मार्गावर ट्रॅक्टर पलटी होऊन त्यात एकाचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी केलेलं बॅरिकेडिंग आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी तोडल्यानंतर पोलिसांनी त्यांना अडवण्याकरता अश्रुधुरांचा वापर केला आणि त्यानंतर लाठीचार्ज केला. यानंतर प्रकरण अधिक चिघळलं आणि आंदोलनकर्ते आक्रमक झाले. काही ठिकाणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी तलवारी आणि इतर हत्यारं काढून पोलिसांना दाखवली.
या आंदोलनात झालेल्या दगडफेकीत, धक्काबुक्कीत काही पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचं पोलिस प्रशासनाने सांगितलं आहे.