पद्मभूषण पंडित राजन मिश्रा यांचं निधन, दिल्लीतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
नवी दिल्ली: पद्मभूषण पंडित राजन मिश्रा (Padma Bhushan Pandit Rajan Mishra) यांचे आज (रविवार) संध्याकाळी 6.30 वाजेच्या दरम्यान निधन झालं. वयाच्या 70व्या वर्षी दिल्लीतील सेंट स्टीफन्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंडित राजन मिश्रा यांना कोरोनाची (Corona) लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसंच त्यांना हृदयविकाराचा देखील त्रास होत होता. सुरुवातीला त्यांना बेड […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: पद्मभूषण पंडित राजन मिश्रा (Padma Bhushan Pandit Rajan Mishra) यांचे आज (रविवार) संध्याकाळी 6.30 वाजेच्या दरम्यान निधन झालं. वयाच्या 70व्या वर्षी दिल्लीतील सेंट स्टीफन्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंडित राजन मिश्रा यांना कोरोनाची (Corona) लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसंच त्यांना हृदयविकाराचा देखील त्रास होत होता. सुरुवातीला त्यांना बेड देखील उपलब्ध होऊ शकला नव्हता मात्र नंतर दिल्लीतील सेंट स्टीफन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.
जाणून घ्या कोण होते राजन मिश्रा
राजन मिश्रा हे भारतातील प्रसिद्ध शास्त्रीय गायक होते. 1971 साली राजन-साजन या जोडीला पंतप्रधानांच्या हस्ते संस्कृत पुरस्कार मिळाला होता. तर 1994-95 साली त्यांना गंधर्व पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं होतं. 2007 साली त्यांना भारत सरकारने कला क्षेत्रातील आपल्या कार्यासाठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं. त्यांच्या गायनाचा संबंहा हा बनारस घराण्याशी होता.
राजन-साजन मिश्रा यांनी 1978 साली त्यांनी पहिल्यांदा श्रीलंकेत संगीत कार्यक्रम केला होता. जो त्यांचा पहिलाच परदेशातील संगीत कार्यक्रम होता. त्यानंतर जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, अमेरिका, ब्रिटन, नेदरलँड्स, यूएसएसआर, सिंगापूर, कतार, बांगलादेश यासह जगातील अनेक देशांमध्ये त्यांनी आपल्या श्रवणीय गायनाने रसिकांना तृप्त केलं होतं. (padma bhushan pandit rajan mishra passes away in delhi)