पंढरपूर : मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विविध जिल्ह्यात मोटारसायकल चोरी करणाऱ्या तिघांच्या टोळीला पकडण्यात पंढरपूर पोलिसांना यश आलं आहे. या टोळीतील एका आरोपीवर विविध जिल्ह्यात ८० गुन्हे दाखल असल्याचं कळतंय. शहरातून चोरीला गेलेल्या एका दुचाकीचा शोध घेत असताना गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेने तिघाजणांची टोळी गजाआड केली.

पोलिसांनी आरोपींकडून ११ लाख ७० हजार रुपये किमतीच्या २३ मोटारसायकल जप्त केल्या आहेत. भिकाजी दादा अवघडे, युवराज अकोबा निकम व किशोर कुमार जगदाळे अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. २० नोव्हेंबर रोजी दुचाकी चोरीचा एक गुन्हा शहर पोलिसांत दाखल झाला होता. त्याअनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम व त्यांचे पथक कसून शोध घेत होते.

यादरम्यान, पंढरपूर येथील कॉलेज चौकात यातील भिकाजी अवघडे हा दुचाकी विक्रीस आला असून गिऱ्हाईकाच्या शोधात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने विक्रीसाठी आणलेली दुचाकी चोरीची असल्याचे कबूल केले. तसेच युवराज निकम व किशोर जगदाळे या दोघांकडून नाममात्र ४४ हजार रूपयांना ही दुचाकी विकत घेतल्याचे त्याने सांगितले. यानंतर त्याकडून आणखी ४ दुचाकी जप्त करण्यात आल्या. दरम्यान, पोलिसांनी निकम व जगदाळे दोघांनाही अटक केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यातील निकम याच्याकडून 2 तर जगदाळे याच्याकडून 16 चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या. पंढरपूर, म्हसवड, विटा, भिगवण, दिघी, बारामती, चिंचवड, हडपसर, लोणी काळभोर, वार्जे, सासवड या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी त्यांनी चोरल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर आरोपींकडून आणखीही दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता सहाय्यक पोलीस निरीक्षक मगदूम यांनी व्यक्त केली.

उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात आलेलं 21 टन गोमांस पकडलं; पालघर पोलिसांची मोठी कारवाई

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT