डोंबिवली : इमारतीच्या ओपन टेरेसचा भाग बाल्कनीवर कोसळला, सुदैवाने जिवीतहानी नाही

इमारतीमधील सदस्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे महापालिका अधिकाऱ्याने आदेश
डोंबिवली : इमारतीच्या ओपन टेरेसचा भाग बाल्कनीवर कोसळला, सुदैवाने जिवीतहानी नाही

डोंबवली पश्चिमेतील त्रिभुवन ज्योत या ४ मजली इमारतीच्या वरच्या मजल्यावरील ओपन टेरेसा भाग खालच्या बाल्कनीवर कोसळला आहे. सुदैवाने यावेळी कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार ही इमारत सुमारे २८ ते २९ वर्ष जुनी आहे. पाच वर्षांपूर्वी या सोसायटीतल्या सदस्यांनी इमारतीची डागडुजी आणि दुरुस्ती करुन घेतली होती. ओपन टेरेसचा भाग ज्या ठिकाणी कोसळला त्या घरात तीन सदस्य राहत असून यापैकी महिला सदस्य ही गर्भवती आहे. परंतू यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही.

या घटनेनंतर महापालिका अधिकाऱ्यांनी इमारतीच्या सदस्यांना स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेण्याची नोटीस बजावली आहे. ज्या बाल्कनीवर हा भाग कोसळला त्या खालील सदस्यांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २४ तासांत स्ट्रक्चरल ऑडीटचा रिपोर्ट आल्यानंतर इमारतीची दुरुस्ती करायची की पुनर्बांधणी याबद्दल निर्णय घेतला जाईल अशी माहिती स्थानिक प्रभाग अधिकारी सुहास गुप्ते यांनी दिली.

Related Stories

No stories found.