Pegasus Spyware : 'त्या' आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी दिलं उत्तर, म्हणाले...

देवेंद्र फडणवीस यांनी पेगासस वरून झालेल्या आरोपांना खरमरीत उत्तर दिलं आहे
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

Pegasus स्पायवेअरवरून सध्या देशात राजकारण तापलं आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवसच वादळी ठरला. देशात हे प्रकरण गाजत असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातही Pegasus Spyware चा वापर करून फडणवीस सरकारच्या काळात फोन टॅपिंग करण्यात आल्याचा आरोप केला. तर सोमवारीच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही फडणवीस मुख्यमंत्री असताना जे फोन टॅपिंग झालं त्या प्रकरणाचा आणि Pegasus Spyware चा काही संबंध होता का? याची चौकशी झाली पाहिजे असं म्हटलं आहे. अशात या आरोपांना आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

महाराष्ट्रात अशी तंत्रज्ञान आणि यंत्रणा आम्हाला रोखण्यासाठी वापरली गेली आणि आजही वापरली जात असावी. हे फार मोठं षडयंत्र आहे आणि सरकारी मदतीशिवाय अशा प्रकारचं धाडस आणि हिम्मत कोणी करु शकत नाही. या देशातल्या पत्रकारांह हजारो प्रमुख लोकांसह फोन रेकॉर्ड झाले आहेत. त्यामुळे या चोऱ्यामाऱ्या बंद करणं थांबवलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. हा जनतेशी विश्वास घात आहे. आज आमची नावं दिसत नसली तरी ती त्यात असणार आहेत याची आम्हाल खात्री आहे. महाराष्ट्रातील अनेक नावे त्यात असण्याची शक्यता आहे

संजय राऊत यांनाही उत्तर

संजय राऊत म्हणतात, जे यामध्ये आहेत, त्यांची नावं हळूहळू बाहेर येतील. येऊ देत. जे खरं असेल, ते बाहेर येईल. पण साप सोडून भुई थोपटण्याचं काम त्यांनी बंद केलं पाहिजे.

आणखी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात देखील पेगाससचा वापर करून नेतेमंडळी, पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. त्यासंदर्भात देखील देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. 'जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो, तोपर्यंत एनएसओची कोणतीही सेवा महाराष्ट्र सरकारने घेतलेली नाही. डीजीआयपीआरचं शिष्टमंडळ गेलं होतं, पण निवडणुकांच्या नंतर गेलं होतं. ते देखील इस्त्रायलची शेती तंत्रज्ञान याविषयी माहिती घेण्यासाठी गेले होते' असं फडणवीस म्हणाले आहेत.

पहिल्या दिवशी संसदेत जो गदारोळ झाला त्याबाबत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अमित शाह यांनी असं म्हटलं आहे याबाबची क्रोनोलॉजी जरा समजून घ्या. पावसाळी अधिवेशन होण्याच्या एक दिवस आधीच ही बाब कशी बाहेर आली? याचं उत्तर सरळ आहे कारण देशात असे लोक आहेत जे देशाच्या प्रगतीत बाधा आणू पाहात आहेत. अशा लोकांचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत. देशाच्या विकासाच्या वाटेत कितीही अडथळे आणा देश प्रगती करणारच असं म्हणत अमित शाह यांनी सोमवारी घडलेल्या प्रकाराबाबत नाराजीही व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in