Petrol-Diesel Price : ठाकरे सरकार देणार दिलासा, पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमध्ये करणार कपात?

मुंबई तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटचा (Petrol Diesel) मुद्दा उपस्थित केला. त्यावरून राज्यात वाद-प्रतिवाद सुरू असून, आता ठाकरे सरकार (Thackeray Government) राज्यातील जनतेला दिलासा देण्याची शक्यता आहे. आज होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या (cabinet meeting) बैठकीत राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करण्याची शक्यता आहे. कोरोना आढावा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांवरून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटचा (Petrol Diesel) मुद्दा उपस्थित केला. त्यावरून राज्यात वाद-प्रतिवाद सुरू असून, आता ठाकरे सरकार (Thackeray Government) राज्यातील जनतेला दिलासा देण्याची शक्यता आहे. आज होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या (cabinet meeting) बैठकीत राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करण्याची शक्यता आहे.

कोरोना आढावा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांवरून महाराष्ट्रासह काही राज्यांचा नामोल्लेख करत व्हॅट कपातीचा मुद्दा उपस्थित केला होता. पंतप्रधान मोदींनी ज्या राज्यांच्या नावांचा उल्लेख केला, त्यात एकाही भाजपशासित राज्याचा समावेश नाही. मात्र, यावरून राज्य-केंद्र संघर्षाच्या ठिणग्या उडताना दिसल्या.

‘टीका करत नाहीये, विनंती करतोय’; मोदींचं ‘ते’ भाषण ज्यावरून राज्यात पेटलाय राजकीय वाद

दरम्यान, राज्यातील जनतेला पेट्रोल-डिझेलच्या किंमतीतून काहीसा दिलासा देण्यासाठी राज्यात हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कपात करण्याच्या संदर्भाने वित्त विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp