पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितले तीन आशीर्वाद, पंढरपूरकरांनी दिला असा प्रतिसाद

मुंबई तक

कोणताही रस्ता हा विकासाचं द्वार असतो. आज पंढपूरकडे जाणारे रस्ते तयार होत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात भागवत धर्माची पताका आणखी उंचावेल याबाबत माझ्या मनात शंका नाही असं प्रतिपादन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि तुकाराम महाराज पालखी मार्ग यांचं व्हर्चुअली भूमिपूजन करण्यात आलं. व्हीडिओ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोणताही रस्ता हा विकासाचं द्वार असतो. आज पंढपूरकडे जाणारे रस्ते तयार होत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात भागवत धर्माची पताका आणखी उंचावेल याबाबत माझ्या मनात शंका नाही असं प्रतिपादन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि तुकाराम महाराज पालखी मार्ग यांचं व्हर्चुअली भूमिपूजन करण्यात आलं. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंढरपूरकरांशी संवाद साधला. यावेळी आपल्या भाषणाची सुरूवात ही त्यांनी मराठीतून केली. तसंच पंढरपूरकरांकडे तीन आशीर्वाद मागितले ज्याला उपस्थितांनी हात उंचावून अभिवादन केलं.

नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी?

तुम्ही माझ्यावर कायमच स्नेह ठेवता हे मला माहित आहे. त्यामुळे आशीर्वाद म्हणून मला तीन गोष्टी द्या. पहिली गोष्ट म्हणजे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी मार्गावर जे पादचारी मार्ग तयार करण्यात येत आहेत त्या मार्गावर दुतर्फा वृक्षांची लागवड करा. महामार्ग तयार होईलर्यंत ही झाडं मोठी होती आणि सावली देतील.

दुसरा आशीर्वाद म्हणजे पालखी मार्गावर शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा ज्याचा वारी चालणाऱ्या वारकऱ्यांना फायदा होईल. तिसरा आशीर्वाद मला पंढरपूरसाठी हवा आहे. भारतातील सर्वात स्वच्छ तीर्थस्थळ ही भारताची ओळख झाली पाहिजे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. हे तीन आशीर्वाद आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितले आहेत. ज्यानंतर उपस्थितांनी हात उंचावले. तुम्ही हात उंचावले म्हणजे मला हे आशीर्वाद मिळाले असं मी समजतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp