PM Modi UNGA: संयुक्त राष्ट्र महासभेत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल

मुंबई तक

PM Modi UNGA: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यादरम्यान आता पंतप्रधान मोदी हे संयुक्त राष्ट्र महासभेला (UNGA)संबोधित करताना पाकिस्तानचं नाव न घेताही त्यांना खडे बोल सुनावले आहेत. या संबोधनात पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. जगभरातील दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तान आणि पंतप्रधान इम्रान खान यांचं नाव न घेता मोदींनी बऱ्याच गोष्टी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

PM Modi UNGA: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यादरम्यान आता पंतप्रधान मोदी हे संयुक्त राष्ट्र महासभेला (UNGA)संबोधित करताना पाकिस्तानचं नाव न घेताही त्यांना खडे बोल सुनावले आहेत.

या संबोधनात पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. जगभरातील दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तान आणि पंतप्रधान इम्रान खान यांचं नाव न घेता मोदींनी बऱ्याच गोष्टी सुनावल्या. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, जे लोकं दहशतवादाचा वापर करत आहेत त्यांच्यासाठीच हा दहशतवाद धोका ठरणार आहे.

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत बोलतांना मोदी म्हणाले की, ‘जे देश दहशतवादाचा राजकीय भांडवल म्हणून वापर करत आहेत त्यांना समजून घ्यावं लागेल की, दहशतवाद हा त्यांच्यासाठी देखील तेवढाच मोठा धोका आहे.’

दरम्यान, अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान मोदी असंही म्हणाले की, अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर हा दहशतवादासाठी होता कामा नये.

हे वाचलं का?

    follow whatsapp