रायगड : पोलिसाचा विवाहीत महिलेवर बलात्कार, पती आणि मुलाला जिवे मारण्याची धमकी देत केले अत्याचार
रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यानेच विवाहीत महिलेला धमकावत तिच्यावर ६ वर्ष शारिरिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. सततच्या त्रासाला कंटाळून या महिलेने अखेरीस पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस असल्याचा गैरफायदा घेत आरोपी पोलीस कर्मचारी शाम जाधवने महिलेला धमकावत गैरफायदा घेतला. तुझ्या पतीला आणि मुलाला मारुन टाकेन […]
ADVERTISEMENT

रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यानेच विवाहीत महिलेला धमकावत तिच्यावर ६ वर्ष शारिरिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. सततच्या त्रासाला कंटाळून या महिलेने अखेरीस पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलीस असल्याचा गैरफायदा घेत आरोपी पोलीस कर्मचारी शाम जाधवने महिलेला धमकावत गैरफायदा घेतला. तुझ्या पतीला आणि मुलाला मारुन टाकेन अशी धमकी देत आरोपीने सहा वर्ष पीडित महिलेशी संबंध ठेवले. अखेरीस आरोपीच्या या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने पेण पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दाखल केली.
दरम्यान आपल्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचं कळताच आरोपीने पोलीस ठाण्यात जाऊन गोंधळ घातला. ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस नाईक व महिला पोलीस उप निरीक्षक घाडगे यांना आरोपीने शिवीगाळ केली. यावेळी ड्युटीवर असलेले पोलीस नाईक गुजराथी व पोलीस शिपाई मढवी हे समजावण्यासाठी गेले असता त्यांना देखील शिवीगाळ करुन हाताबुक्क्याने मारहाण केली.