Pooja Chavan प्रकरणी पोलीस आयुक्तांनी हसत हसत सोडली पत्रकार परिषद
७ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात एक प्रकरण गाजतं आहे आणि ते आहे पूजा चव्हाणचं मृत्यू प्रकरण. पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर काही गंभीर आरोप झाले. ज्यानंतर त्यांना राजीनामाही द्यावा लागला. आज पुण्यात पोलिसांची पत्रकार परिषद आयोजित कऱण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ताही होते. त्यांना जेव्हा पूजा चव्हाण प्रकरणात प्रश्न विचारण्यात आले […]
ADVERTISEMENT

७ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात एक प्रकरण गाजतं आहे आणि ते आहे पूजा चव्हाणचं मृत्यू प्रकरण. पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर काही गंभीर आरोप झाले. ज्यानंतर त्यांना राजीनामाही द्यावा लागला. आज पुण्यात पोलिसांची पत्रकार परिषद आयोजित कऱण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ताही होते. त्यांना जेव्हा पूजा चव्हाण प्रकरणात प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं सोडून हसत हसत पत्रकार परिषद सोडून जाणं पसंत केलं.
नेमकं काय घडलं?
पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी या प्रकरणात आरोप झालेले मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे का?, पोस्टमॉर्टमचा अहवाल नेमका काय आला आहे? हे आणि यांसारखेच काही प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी उठून उभे राहिले आणि हसत हसत तिथून निघून गेले. पत्रकार त्यांना विनंती करत होते. मात्र त्यांनी पत्रकार परिषद ज्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती त्या हॉलमधून निघून जाणं पसंत केलं. त्यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
पाहा पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हसत हसत पत्रकार परिषद कशी सोडली तो व्हीडिओ