Sharad Pawar: पवारांच्या मनात नेमकं काय?, प्रशांत किशोर तिसऱ्यांदा शरद पवार यांच्या भेटीला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) हे आज (23 जून) पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. गेल्या बारा दिवसातील या दोघांमधील ही तिसरी भेट आहे.

प्रशांत किशोर यांच्यासारख्या राजकीय रणनीतिकाराने सतत पवारांच्या भेट घेण्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. पण या सगळ्या भेटीगाठींमध्ये शरद पवार यांच्या मनात नेमकं काय आहे? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

सर्वात आधी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची मुंबईत भेट झाली होती. यावेळी ही बैठक जवळजवळ तीन तास सुरु होती. तर शरद पवार दिल्लीत पोहचल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रशांत किशोर यांनी पुन्हा त्यांची भेट घेतली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या भेटीला दोन दिवस उलटत नाही तोच आज पुन्हा एकदा प्रशांत किशोर हे पवारांच्या घरी पोहचले आहेत. यामुळे आता पवारांच्या मनात नेमकं काय तरी आहे अशी जोरदार चर्चा सुरु आहे.

दरम्यान, कालच (22 जून) शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रमंचची एक बैठक पार पडली. ज्या बैठकीला देशातील अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकं हजर होते. मात्र, देशातील प्रमुख पक्षाचे नेते त्यात सहभागी नव्हते.

ADVERTISEMENT

या सगळ्यामुळे शरद पवार तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत का? अशी देखील सध्या चर्चा सुरु झाली आहे.

ADVERTISEMENT

आतली बातमी: शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या बैठकीतील Inside Story… जशीच्या तशी!

पण असं असलं तरीही प्रशांत किशोर यांनी असं म्हटलं होतं की, 2024 च्या निवडणुकीत तिसरी किंवा चौथी आघाडी ही भाजपचा मुकाबला करु शकत नाही.

दुसरीकडे राष्ट्रमंचच्या बैठकीनंतर देखील हेच सांगण्यात आलं की, ही बैठक भाजपविरोधी नव्हती. तर सध्याच्या स्थितीत समान विचारधारा असलेल्या लोकांना एकत्र येऊन काही मुद्द्यांवर लढा द्यावा यासाठी ही बैठक होती.

‘मोदी, भाजप विरोधी आघाडी करण्यासाठी बैठक बोलवण्यात आली नव्हती’

प्रशांत किशोर यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की, त्यांची पवारांसोबतची बैठक आणि तिसऱ्या किंवा चौथ्या आघाडीचा काहीही संबंध नाही. त्यांनी असं म्हटलं होतं की, ही फक्त सदीच्छा भेट आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी याआधीही मोदी सरकारला आव्हान देण्यासाठी देशात सर्व पक्षांची एका संयुक्त आघाडी असावी अशी इच्छा व्यक्त केली होती.

Prashant Kishor आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राला झाली चार राजकीय भेटींची आठवण

सूत्रांच्या मते, पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीबाबत तात्काळ काही अंदाज व्यक्त करणं हे थोडं घाईचं ठरु शकतं. पण प्रशांत किशोर हे देखील सर्व पर्यायांची मोजून-मापून चाचपणी करत असल्याचं समजतं आहे. कारण त्यांना माहिती आहे की, भाजपविरोधात एक मोठा विजय हा त्यांच्या करिअरला राष्ट्रीय स्तरावर वेगळा आकार देऊ शकतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT