Presidential Election Results 2022 : द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा?; मतमोजणी सुरू
द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा, देशाचे १५वे राष्ट्रपती कोण? या प्रश्नाचं उत्तर आज (२१ जुलै) सायंकाळपर्यंत मिळेल. सकाळी ११ वाजता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली. सायंकाळपर्यंत मतमोजणी चालणार असून, ४ वाजता निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान झालं होतं. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएकडून द्रौपदी मुर्मू या उमेदवार आहेत, तर विरोधकांकडून […]
ADVERTISEMENT

द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा, देशाचे १५वे राष्ट्रपती कोण? या प्रश्नाचं उत्तर आज (२१ जुलै) सायंकाळपर्यंत मिळेल. सकाळी ११ वाजता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली. सायंकाळपर्यंत मतमोजणी चालणार असून, ४ वाजता निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान झालं होतं.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएकडून द्रौपदी मुर्मू या उमेदवार आहेत, तर विरोधकांकडून यशवंत सिन्हा हे उमेदवार आहेत. विरोधकांच्या तुलनेत एनडीएच्या बाजूने जास्त मतदान झालं असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे द्रौपदी मुर्मू जिंकल्यास, देशाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरणार आहेत.
विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे २५ जुलै रोजी देशाचे नवे राष्ट्रपती पदाची शपथ घेतील.
मिळालेल्या माहितीप्रमाणे राष्ट्रपतीपदाच्या मतमोजणीआधी आमदारांच्या मतांची छाननी केली जाईल. त्यानंतर खासदारांच्या आणि त्यानंतर निवडणूक अधिकारी राज्यसभेचे महासचिव पीसी मोदी मतांची पडताळणी करतील. नियमाप्रमाणे खासदारांच्या मतपत्रिकांवर हिरव्या रंगाने, तर आमदारांच्या मतपत्रिकांवर गुलाबी रंगात लिहिलेलं असेल.