पुणे : विमानात बॉम्ब असल्याच्या अफवेनं खळबळ; कारण आलं समोर

मुंबई तक

तुम्ही मुंबई मेरी जान सिनेमा बघितलाय का? बघितला असेल, तर त्यातील अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे मॉलमध्ये बॉम्ब असल्याचं सांगून उडालेल्या धावपळीचा प्रसंग तुम्हाला आठवत असेल. असंच काहीसं घडलं आहे पुण्यातील लोहगाव विमानतळावर! विमानात बॉम्ब असल्याच्या अफवेनं एकच धावपळ उडाली. ही अफवा पसरवली ती आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका व्यक्तीनं. तर झालं असं की, पुणे लोहगाव विमानतळ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

तुम्ही मुंबई मेरी जान सिनेमा बघितलाय का? बघितला असेल, तर त्यातील अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे मॉलमध्ये बॉम्ब असल्याचं सांगून उडालेल्या धावपळीचा प्रसंग तुम्हाला आठवत असेल. असंच काहीसं घडलं आहे पुण्यातील लोहगाव विमानतळावर! विमानात बॉम्ब असल्याच्या अफवेनं एकच धावपळ उडाली. ही अफवा पसरवली ती आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका व्यक्तीनं.

तर झालं असं की, पुणे लोहगाव विमानतळ 16 ते 30 ऑक्टोबर दरम्यान धावपट्टीच्या कामानिमित्त विमान सेवा बंद राहणार आहे. मात्र काल शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता हृषिकेश सावंत त्याच्या पत्नीला पुणे विमानतळावर सोडण्यास गेला होता. त्याची पत्नी रांचीला जात होती.

सकाळी 8:50 वाजता जाणाऱ्या एअर एशियाच्या पुणे-रांची विमानाने त्या जाणार होत्या. त्याचवेळी ते 16 तारखेचं परतीचं तिकीट कन्फर्म करीत होते. मात्र तेथील विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तिकिट होणार नसल्याचं कारण सांगितलं.

त्यावेळी हृषिकेश याचं तेथील कर्मचाऱ्यांसोबत भांडण झालं. भांडणादरम्यानच विमानामध्ये बॉम्ब असल्याचं हृषिकेश यानं सांगितलं. त्यावर सर्व यंत्रणेची एकच धावपळ उडाली.

हे वाचलं का?

    follow whatsapp