मराठा विद्याप्रसारक संस्थेचा वाद: गिरीश महाजनांच्या अडचणीत वाढ, पुणे पोलिसांची जळगावात छापेमारी
– मनिष जोग, जळगाव प्रतिनिधी माजी मंत्री आणि जळगाव जिल्ह्यातील जामनेरचे भाजप आमदार गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्याच्या कोथरुड पोलिसांनी आज जळगावात ५ ठिकाणी छापेमारी केली आहे. पुणे पोलिसांचं सुमारे ६० ते ७० जणांचं पथक आज जळगावात छापेमारीसाठी आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. मराठा विद्याप्रसारक संस्थेशी निगडीत वादात ही छापेमारी सुरु […]
ADVERTISEMENT

– मनिष जोग, जळगाव प्रतिनिधी
माजी मंत्री आणि जळगाव जिल्ह्यातील जामनेरचे भाजप आमदार गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्याच्या कोथरुड पोलिसांनी आज जळगावात ५ ठिकाणी छापेमारी केली आहे. पुणे पोलिसांचं सुमारे ६० ते ७० जणांचं पथक आज जळगावात छापेमारीसाठी आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. मराठा विद्याप्रसारक संस्थेशी निगडीत वादात ही छापेमारी सुरु असल्याचं कळतंय.
काय आहे वादाची पार्श्वभूमी?
जळगावच्या मराठा विद्याप्रसारक संस्थेवर गेल्या काही वर्षांपासून तानाजी भोईटे आणि दिवंगत नरेंद्र पाटील या गटामध्ये वर्चस्ववादाची लढाई सुरु आहे. तानाजी भोईटे यांचा गट हा गिरीश महाजनांच्या बाजूने तर नरेंद्र पाटील यांचा गट हा एकनाथ खडसेंच्या बाजूने मानला जातो. नरेंद्र पाटील यांच्या निधनानंतर Adv. विजय पाटील यांच्याकडे या गटाचं नेतृत्व आलं आहे.