पुणे : पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची पोलिसानेच दिली सुपारी; सराईत गुन्हेगाराला बेड्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुण्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ठार करण्याची सुपारी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनं पुणे पोलीस दलात खळबळ उडाली असून, पोलिसांनी सुपारी देण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. दरम्यान, ज्या पोलीस कर्मचाऱ्याने सुपारी दिली होती, तो फरार आहे.

पुणे शहरातील फरासखाना पोलीस ठाण्यामधील एका कर्मचार्‍याने दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची सराईत गुन्हेगाराला सुपारी दिल्याचा प्रकाराची पोलीस दलात चर्चा होत आहे.

धक्कादायक ! पुणे पोलीस दलाच्या महिला पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नितीन दुधाळ असं सुपारी देणाऱ्या आरोपीचं नाव असून, तो पुणे पोलीसद दलात पोलीस अमलदार म्हणून कार्यरत आहे. योगेश अडसूळ या सराईत गुन्हेगाराला नितीन दुधाळ याने सुपारी दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये अमलदार नितीन दुधाळ आणि दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये दिनेश दोरगे हे दोघे कार्यरत आहेत. त्या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून मैत्री होती. मात्र मध्यतरी दोघांमध्ये काही वैयक्तिक कारणावरून वाद होण्यास सुरुवात झाली. ते सतत सुरू राहिल्याने नितीन दुधाळ याने सराईत गुन्हेगार योगेश अडसूळ याला दिनेश दोरगे यांना जीवे मारण्याची सुपारीच दिली.

ADVERTISEMENT

पुणे : लाखोंची फसवणूक, तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार; ‘ते’ व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी

ADVERTISEMENT

त्यानंतर योगेश अडसूळ याने दिनेश दोरगे यांचा अनेक वेळा पाठलाग केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी अडसूळला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये अमलदार म्हणून कार्यरत असणाऱ्या नितीन दुधाळ याने दिनेश दोरगे यांना मारण्याची सुपारी दिल्याचे सांगितले.

आरोपी अडसूळ याने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची माहिती आरोपी नितीन दुधाळ याला होताच, तो फरार झाला. नितीश दुधाळचा शोध सुरू असल्याचे दत्तवाडी पोलिसांनी सांगितले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT