Queen Elizabeth Death: ब्रिटनमध्ये दहा दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर, स्कॉटलँडची संसद स्थगित

महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर ब्रिटनवर शोककळा
queen elizabeth ii died britain enters 10 days of official mourning operation unicorn
queen elizabeth ii died britain enters 10 days of official mourning operation unicornफोटो सौजन्य- The Royal Family FB Page

Britain Queen Elizabeth II died: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरूवारी निधन झालं. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रॉय फॅमिलीने दिलेल्या माहिती नुसार महााणी एलिझाबेथ या मागील काही काळापासून episodic mobility या आजाराने त्रस्त होत्या. या आजारामुळे त्यांना उभं राहण्यात आणि चालण्यात अडचणी येत होत्या. महाराणी एलिझाबेथ यांना फेब्रुवारी महिन्यात कोरोनाही झाला होता. एलिझाबेथ यांची प्रकृती गुरूवारी सकाळी बिघडली. तेव्हापासून त्या डॉक्टरांच्या देखरेखीखालीच होत्या.

राणी एलिझाबेथ यांची ७० वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची कारकीर्द थोडी-थोडकी नाही तर तब्बल ७० वर्षांची ठरली. या कालावधीत त्यांनी ब्रिटनचे १५ पंतप्रधान पाहिले. महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा चार्ल्स हे ब्रिटनचे किंग झाले आहेत. एलिझाबेथ या फक्त ब्रिटनच्या नाही तर १४ आणखी देशांच्या महाराणी होत्या. हेच पद आता किंग चार्ल्स यांच्याकडे आलं आहे.

प्रिन्स फिलिप यांच्यासोबत एलिझाबेथ यांचा विवाह

१९३९ मध्ये जेव्हा एलिझाबेथ १३ वर्षांच्या होत्या तेव्हा त्या आपल्या वडिलांसोबत आणि आईसोबत डार्टमथ येथील रॉयल नेव्हल कॉलेमध्ये जाऊ लागल्या. तिथे त्यांची भेट ग्रीसचे प्रिन्स फिलिप यांच्यासोबत झाली. ही त्यांची पहिली भेट नव्हती. मात्र जेव्हा नेव्हल कॉलेजमध्ये हे दोघं भेटले तेव्हा एलिझाबेथ यांना प्रिन्स फिलिप आवडू लागले. सुट्टी असताना प्रिन्स फिलिपही आपल्या राजघराण्यातील नातेवाईकांना भेटण्यासाठी लंडनमध्ये पोहचले. १९४४ वर्ष संपत असताना एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलिप यांच्या प्रेमकहाणीने आकार घेतला होता. ते दोघेही एकमेकांना चिठ्ठी पाठवत असत. एलिझाबेथ या त्यांच्या खोलीत प्रिन्स फिलिप यांचे फोटोही ठेवू लागल्या होत्या.

दुसरं महायुद्ध संपल्यानंतर एलिझाबेथ या प्रिन्स फिलिप यांच्याशी विवाह करू इच्छित होत्या. मात्र त्यांच्या मार्गात काही अडथळे होते. एलिझाबेथ यांचे वडील किंग जॉर्ज हे आपल्या मुलीला दूर करू इच्छित नव्हते. तर प्रिन्स फिलीप हे दुसऱ्या देशाचे होते हे देखील लग्नाला आक्षेप घेण्याचं कारण होतं. मात्र या सगळ्या अडचणी दूर झाल्या. २० नोव्हेंबर १९४७ ला लंडनच्या शाही चर्चमध्ये हे दोघं विवाहबद्ध झाले.

queen elizabeth ii died britain enters 10 days of official mourning operation unicorn
Queen Elizabeth यांचा राजकुमारी ते महाराणी होण्याचा प्रवास, पाहा खास फोटो

ऑपरेशन युनिकॉर्न सुरू

स्कॉटलँडच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर ऑपरेशन युनिकॉर्न सुरू कऱण्यात आलं आहे. महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनाच्या दिवसांपासून पुढचे दहा दिवस होणाऱ्या कार्यक्रमांसाठी ऑपरेशन लंडन ब्रिज तयार केला होता. मात्र स्कॉटलँडमध्ये महाराणींचा मृत्यू झाला. त्यामुळे या ऑपरेशनचं नाव स्कॉटलँडचा राष्ट्रीय पशू युनिकॉर्नच्या नावे ठेवण्यात आलं. नवे किंग चार्ल्स यांच्यासह शाही कुटुंबातले इतर सदस्यही बालमोरलमध्ये पोहचले आहेत. एलिझाबेथ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

queen elizabeth ii died britain enters 10 days of official mourning operation unicorn
Queen Elizabeth : सात दशकांचा गौरवशाली प्रवास इतिहासजमा, कशी होती क्वीन एलिझाबेथ यांची कारकीर्द?

वेस्टमिन्सिटर अॅबे या ठिकाणी होणार अंत्यसंस्कार

महाराणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर स्कॉटलँडची संसद स्थगित करण्यात आली आहे. महाराणी एलिझाबेथ यांचं पार्थिव हे आधी रॉयल ट्रेनने एडिनबर्ग या ठिकाणी आणण्यात येईल. त्यानंतर त्यांचं कॅफेन रॉयल माइल ते सेंट जाइल्स कॅथेड्रल पर्यंत नेण्यात येईल. या ठिकाणी शाही परिवारातले सदस्य आणि जनता महाराणी एलिझाबेथ यांच्या पार्थिवाला आदरांजली वाहणार आहे.

बकिंगहॅम पॅलेसमध्ये महाराणींचं पार्थिव आणलं जाणार

महाराणी एलिझाबेथ यांचं पार्थिव पुन्हा एकदा रॉयल ट्रेनमध्ये ठेवून बकिंगहॅम पॅलेस लंडन या ठिकाणी आणलं जाणार आहे. कदाचित हवाई मार्गानेही महाराणी एलिझाबेथ यांचं पार्थिव हे लंडनला आणलं जाण्याची शक्यता आहे. लंडनमधे पंतप्रधान आणि कॅबिनेटचे सदस्य पार्थिव ताब्यात घेतील. बकिंगहॅम पॅलेसमध्ये महाराणी एलिझाबेथ यांचं पार्थिव ठेवण्यात आल्यानंतर ८ दिवसांचा दुखवटा असेल. त्यानंतर वेस्टमिंन्स्टर एबे या ठिकाणी महाराणीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात य़ेतील.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in