MNS : हलाल विरुद्ध झटका वाद पुन्हा उफळला, यशवंत किल्लेदार आक्रमक, राज ठाकरेंचे मनसैनिकांना नवे आदेश

मशिदींवरील भोंगेहटाव आंदोलनानंतर मनसेने छेडले नवीन आंदोलन...
MNS Yashwant Killedar Aggressive Against Halal Meat
MNS Yashwant Killedar Aggressive Against Halal Meat Mumbai Tak

मुंबई : मशिदींवरील भोंगेहटाव आंदोलनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता 'हलाल' या मटण कापण्याच्या पद्धतीविरोधात आंदोलन पुकारले आहे. मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. किल्लेदार म्हणाले, हलाल आणि झटका या कत्तलीच्या पद्धती आहेत. हा मुद्दा फक्त धार्मिक मुद्दा नाही तर अर्थव्यवस्थेवर त्याचा होणारा परिणाम याकडे आम्ही पाहत आहोत.

15 टक्के मुस्लिम धर्मीयांसाठी हलाल पद्धत असली तरी इतर धर्मियांनी हे का मानायचं? अरब देशात हलाल केलेल्या मांसची मागणी आहे. पण भारतीय अर्थव्यवस्थेलाही हलालचा फटका बसतो. याचे पैसे अतिरेक्यांच्या न्यायालयील खटल्यांसाठी वापरले जातात. यासाठी जनजागृती म्हणून 'नो टू हलाल मोहीम' ही चळवळ उभी करणार आहोत.

MNS Yashwant Killedar Aggressive Against Halal Meat
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळावा हायजॅक करणार का? देवेंद्र फडणवीस यांनी दिलं उत्तर, म्हणाले...

मनसेचे यशवंत किल्लेदार हलाल विरोधात आक्रमक

यशवंत किल्लेदार पुढे म्हणाले, हलाल ही मुस्लिम धर्मियांकडून बकऱ्याला कापण्याची ही क्रूर पद्धत आहे. ऐवढचं नाही तर मक्क्याकडे तोंड करून त्यांची कत्तल होते. 15 टक्के मुस्लिम धर्मियांची ही पद्धत 85 टक्के लोकांवर का लादायची. सरकारने एकदा का त्यांना या गोष्टी आयात व निर्यातीला परवानगी दिली की, इतर पदार्थही याद्वारे पाठवले जात आहे.

हिंदू, शीख, ख्रिस्ती धर्मीय झटका पद्धतीचे मांस खातात. मूळ मांसासाठी असणारे हलाल प्रमाणपत्र आता खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, आयुर्वेदिक औषधे, रुग्णालय यांच्यासह मॅकडोनाल्ड, केएफसी, या कंपन्यांनी घेतले आहे.

MNS Yashwant Killedar Aggressive Against Halal Meat
यंदाचा दसरा मेळावा कुणाचा? उद्धव ठाकरेंचा की एकनाथ शिंदेंचा?

बाजारात हलालचे मटण घेण्यावर दबाव वाढत आहे. मात्र झटका मटणाला विरोध होत आहे. हलालमुळे हिंदू खाटीक वाल्मिकी समाजास रोजी रोटी मिळत नाही. हलाल ही पद्धत मुस्लिमांना पाहिजे तर त्यांनी ठेवावी पण ती इतरांवर लादू नये. आम्ही येत्या काळात पत्रक काढू, ज्या कंपन्या आहेत त्यांना माहिती देऊ. पत्र देऊनही ऐकले तर ठिक न एकल्यास संबधित कंपनींना मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल. येत्या काळात व्यापार्यांच्या असोसिएशनचीही बैठक घेऊन त्यांना मुद्दा स्पष्ट करणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in