Raj Thackeray : राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात विघ्न, आखाडा परिषदेचे अध्यक्ष काय म्हणाले?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यावरून उत्तर प्रदेशातील वातावरण तापलं आहे. ५ जून रोजी होणाऱ्या दौऱ्यात विघ्न येण्याची चिन्ह दिसत आहेत. कारण गोंडाचे खासदार आणि अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी आव्हान दिलं आहे. त्यात आता सर्व मोठे महंत आणि धर्माचार्यांनीही सिंह यांना पाठिंबा दिला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यावरून उत्तर प्रदेशातील वातावरण तापलं आहे. ५ जून रोजी होणाऱ्या दौऱ्यात विघ्न येण्याची चिन्ह दिसत आहेत. कारण गोंडाचे खासदार आणि अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी आव्हान दिलं आहे. त्यात आता सर्व मोठे महंत आणि धर्माचार्यांनीही सिंह यांना पाठिंबा दिला आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्येत जाणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच त्यांच्या या दौऱ्याला विरोध होताना दिसत आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी सर्वप्रथम भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी केली.
त्यांच्या मागणीला आता उत्तर प्रदेशात पाठिंबा मिळताना दिसत आहे. बृजभूषण शरण सिंह यांच्याबरोबरच आता साधूसंतांकडून राज ठाकरेंकडे माफीची मागणी केली जात आहे.
इतकंच नाही, तर येथील महंत आणि संतांनी अयोध्येतील रस्त्यांवर बॅनर्स लावले आहेत. या बॅनर्सच्या माध्यमातून त्यांनी राज ठाकरेंच्या दैाऱ्याला विरोध केला आहे.