मोदींच्या पाया पडते, पण हे राजकारण थांबवा – ममता बॅनर्जी

मुंबई तक

यास चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी पश्चिम बंगाल दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे चांगलाच वाद रंगला. पंतप्रधानांसारख्या व्यक्तीला ममता बॅनर्जींना वाट पहायला लावल्यामुळे भाजप नेत्यांनी ममता दीदींवर टीकेची झोड उठवली. अखेरीस ममता बॅनर्जींनी या प्रकरणावर आपलं मौन सोडलं आहे. मोदींच्या पाया पडते पण हे राजकारण थांबवा अशा शब्दांत ममना बॅनर्जींनी आपली बाजू मांडली […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

यास चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी पश्चिम बंगाल दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे चांगलाच वाद रंगला. पंतप्रधानांसारख्या व्यक्तीला ममता बॅनर्जींना वाट पहायला लावल्यामुळे भाजप नेत्यांनी ममता दीदींवर टीकेची झोड उठवली. अखेरीस ममता बॅनर्जींनी या प्रकरणावर आपलं मौन सोडलं आहे. मोदींच्या पाया पडते पण हे राजकारण थांबवा अशा शब्दांत ममना बॅनर्जींनी आपली बाजू मांडली आहे.

“मला खूप वाईट वाटलं, PMO ने केवळ एकांगी बाजू मांडून माझा अपमान केलाय. ज्यावेळी मी कामं करत होते, त्यावेळी ही मंडळी अशा बातम्या पसरवत होते. लोकांसाठी मी मोदींचे पाय धरायला तयार आहे, पण हे राजकाण थांबवा. असल्या राजकीय हेतूंनी प्रेरित आरोप करत मला यामध्ये ओढू नका. मला राज्यातल्या वादळाचा फटका बसलेल्या आणि कोविडच्या रुग्णांसाठी काम करु द्या.” पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जींनी आपली नाराजी व्यक्त केली.

ममता बॅनर्जी मोदींसोबतच्या बैठकीत गैरहजर राहिल्यानंतर केंद्र सरकारने तात्काळ कारवाई करत पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांना तात्काळ नवी दिल्लीला बोलवून घेतलं आहे. बंडोपाध्याय यांची Ministry of Public Grievances and Pensions विभागात बदली करण्यात आली आहे. ममता बॅनर्जींनी केंद्राच्या या निर्णयाविरोधातही नाराजी व्यक्त केली आहे.

१९८७ च्या कॅडरचे आयएएस अधिकारी असलेले बंडोपाध्याय हे ममता बॅनर्जींच्या जवळचे मानले जातात. बंडोपाध्याय यांची दिल्लीला बदली ही अवैध पद्धतीने करण्यात आल्याचा आरोपही ममता बॅनर्जींनी केला. मुख्य सचिवांना अशी वागणूक देऊन केंद्राने पश्चिम बंगालच्या जनतेचा अपमान केला आहे. लोकांनी तुम्हाला नाकारलं आहे आणि आम्हाला सत्ता दिली आहे. त्यामुळे जनतेने दिलेला कौल स्विकारा असं म्हणत ममतांनी मोदींना टोला लगावला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp