Shivsena-NCP मधला वाद पेटला ! कोल्हेंनी उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घेण्याचा प्रयत्न करु नये – शिवाजीराव पाटील

मुंबई तक

खेड तालुक्यातील बायपासच्या उद्घाटनावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला वाद आता आणखीनच पेटला आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्या नियोजीत कार्यक्रमाआधीच माजी खासदार आढळराव पाटलांनी बायपासचं उद्घाटन केलं. यानंतर निजोयित कार्यक्रमात बोलत असताना अमोल कोल्हेंनी शरद पवारांच्या आशिर्वादानेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचा उल्लेख केला. अमोल कोल्हेंच्या या वक्तव्याचा शिवाजीराव आढळराव पाटलांनी समाचार घेतला आहे. “बायपासचं काम मी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

खेड तालुक्यातील बायपासच्या उद्घाटनावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला वाद आता आणखीनच पेटला आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्या नियोजीत कार्यक्रमाआधीच माजी खासदार आढळराव पाटलांनी बायपासचं उद्घाटन केलं. यानंतर निजोयित कार्यक्रमात बोलत असताना अमोल कोल्हेंनी शरद पवारांच्या आशिर्वादानेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचा उल्लेख केला. अमोल कोल्हेंच्या या वक्तव्याचा शिवाजीराव आढळराव पाटलांनी समाचार घेतला आहे.

“बायपासचं काम मी खासदार असताना सुरु केलं होतं, तरीही या कार्यक्रमाला मला डावलण्यात आलं. माझ्या मुख्यमंत्र्यांचा एकही फोटो तिकडे नव्हता. मला या कार्यक्रमात बोलवावं एवढी माझी माफक अपेक्षा होती. कोल्हेंनी स्वतःची लायकी पाहून बोलावं. स्थानिक विषयांत पवार आणि ठाकरेंचा प्रश्न येतो कुठे? त्यांनी उगाच उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घ्यायला जाऊ नये. हाच लबाड कोल्हा शिवसेनेत राहून मोठा झाला. शिवसेनेने यांना ओळख दिली, पद दिलं. आता याच शिवसेनेला तुम्ही बोलत आहात याला काय म्हणायचं?” अशा शब्दांत पाटलांनी अमोल कोल्हेंना सुनावलं आहे.

Uddhav Thackeray शरद पवारांच्या आशीर्वादाने CM मग NCP कुणामुळे सत्तेत? -शिवसेना

शनिवारी पार पडलेल्या कार्यक्रमात अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांचं नाव न घेता म्हातारा असा उल्लेख केला होता. याला उत्तर देताना, मी म्हातारा असलो तरी माझ्याकडे बुद्धीमत्ता आहे, समज आहे. खालच्या पातळीवर जाऊन तरुण आणि म्हातारे असं काहीतरी समीकरण जोडून लोकांची दिशाभूल करणं त्यांनी थांबवावं. माझं काम नटसम्राटासारखं नसल्याचंही पाटील म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp