प्रायव्हेट जेटमध्ये रोमान्स करण्याचा विचार करत होती पत्नी, वाचा पतीने काय केलं

एका महिलेला आपल्या पतीसोबत जेट विमानात रोमान्स करायचा होता. तिची हीच इच्छा पतीने कशी पूर्ण केली जाणून घ्या सविस्तर.
romance in private jet husband surprise gift on wifes birthday
romance in private jet husband surprise gift on wifes birthday( फोटो- Facebook/ Love Cloud Vegas)

ह्यूस्टन (अमेरिका): एका महिलेच्या मनात अनेकदा एक भन्नाट विचार यायचा. पण ती जो विचार करत होती ते फक्त चित्रपटातच घडतं असं तिला वाटायचं. खरं म्हणजे फ्लाईटमध्ये उंच आकाश आपल्या जोडीदारासोबत रोमान्स करण्याचा ती नेहमी विचार करत असे. पण महिलेला कल्पना नव्हती की, तिचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल.

अमेरिकेतील Houston येथे राहणाऱ्या कॅथरीन नगुयेनने सांगितले की, जानेवारी 2022 मध्ये ती आपल्या पतीसोबत Las Vegas येथे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. या सुट्टीचं निमित्त होतं ते तिच्या वाढदिवसाचे. व्यवसायाने X-ray technologist टेक्नॉलॉजिस्ट असलेल्या कॅथरीनने सांगितले की, तिच्या पतीने तिच्या वाढदिवशी खरोखरच खूप मोठं आणि एक खास सरप्राईज दिलं.

ब्रँडन नगुयेन यांनी पत्नी कॅथरीनला खासगी जेट बुक करून वाढदिवसाची भेट दिली. तसेच, या प्रायव्हेट जेटला रोमँटिक पद्धतीने सजवण्यात आले होते, जेणेकरून या जोडप्याला त्यांचे खाजगी क्षण खास बनवता येतील.

romance in private jet husband surprise gift on wifes birthday
पतीच्या निधनाचे दुःख असह्य झाल्याने पत्नीची आत्महत्या, मंगळवेढ्यातली घटना

जोडप्यांसाठी खाजगी जेट विशेष सेवा

न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना कॅथरीन म्हणाली की, 'मला फ्लाइटमध्ये सेक्स करण्याची नेहमीच इच्छा होती. पण मला असे वाटायचे की हे फक्त चित्रपटांमध्येच घडते. अशा सुविधा प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत हे मला माहीत नव्हते.'

अमेरिकेतील अनेक कंपन्या जोडप्यांना रोमान्स करण्यासाठी खाजगी जेट सेवा देतात. लव्ह क्लाउड नावाची कंपनी सुमारे 45 मिनिटांच्या फ्लाइटसाठी 74 हजार रुपये आकारते. तसेच रोमँटिक डिनरसाठी फ्लाइट सेवा देखील येथे पुरवली शकते.

( फोटो- Facebook/ Love Cloud Vegas)

लव्ह क्लाउडचे संस्थापक पायलट अँडी जॉन्सन म्हणतात की ते जोडप्यांना घटस्फोट घेण्यापासून एक प्रकारे वाचवतच आहेत. अनेक जोडप्यांचे असेही म्हणणे आहे की, रोमँटिक फ्लाइट बुक केल्यानंतर त्यांचे नाते अधिक चांगले झाले आहे.

30 वर्षीय ख्रिस लोपेजने सांगितले की, 10 वर्ष संसार केल्यानंतर त्याचे त्याच्या पत्नीसोबतचं नातं थोडं खराब झालं होतं. यानंतर, त्याने लव्ह क्लाउडवर डिनर फ्लाइट बुक करून आपल्या पत्नीला प्रचंड आश्चर्याचा धक्का दिला होता. ख्रिसने सांगितले की, त्याची ही योजना यशस्वी झाली आणि त्याच्या पत्नीला त्यातून खूप आनंद मिळाला. ज्यामुळे त्या मोडणारा संसार देखील वाचला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in