Salman Rushdie यांनी जीवघेण्या हल्ल्यात एक डोळा गमावला, एक हातही निकामी
भारतीय वंशाचे ब्रिटिश लेखक आणि जगप्रसिद्ध कादंबरीकार सलमान रश्दी यांच्यावर काही महिन्यांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्यांनी एक डोळा गमावला आहे आणि त्यांचा एक हात निकामी झाला आहे. द गार्डियनने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. न्यूयॉर्कमध्ये सलमान रश्दी यांचं व्याख्यान सुरू असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. नेमकी काय घडली होती घटना? १२ […]
ADVERTISEMENT

भारतीय वंशाचे ब्रिटिश लेखक आणि जगप्रसिद्ध कादंबरीकार सलमान रश्दी यांच्यावर काही महिन्यांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्यांनी एक डोळा गमावला आहे आणि त्यांचा एक हात निकामी झाला आहे. द गार्डियनने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. न्यूयॉर्कमध्ये सलमान रश्दी यांचं व्याख्यान सुरू असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.
नेमकी काय घडली होती घटना?
१२ ऑगस्टला सलमान रश्दी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. न्यूयॉर्कमध्ये ही घटना घडली. त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले आहेत. या घटनेत सलमान रश्दी जखमी झाले. लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये हल्ला झाला. बफेलोजवळ चौटोका या ठिकाणी सलमान रश्दी हे व्याख्यान देण्यासाठी गेले होते. तिथे स्टेजवर बसलेले असताना त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. या घटनेत सलमान रश्दी जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता त्यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समोर आली आहे. त्यांचा एक हात अधू झाला आहे तर एक डोळा निकामी झाला आहे.
सलमान रश्दी यांचे एजंट काय म्हणाले?
सलमान रश्दी यांचा एजंट अँड्र्यू वायली याने एल पेस वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, सलमान रश्दी यांच्या जखमा खोल आहेत. त्याच्या एका डोळ्याची दृष्टी गेली आहे. घशात तीन गंभीर जखमा होत्या. हातातील नसा कापल्या गेल्याने एक हात निकामी झाला आहे. त्यांच्या छातीवर आणि धडावर 15 जखमा होत्या.
द सॅटेनिक व्हर्सेस या पुस्तकामुळे सलमान रश्दी वादात
द सॅटेनिक व्हर्सेस या पुस्तकामुळे मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला होता. १९८० च्या दशकात हे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. मुस्लिम समाजात या पुस्तकावरून वाद निर्माण झाला होता. सलमान रश्दी हे जागतिक किर्तीचे लेखक आहेत. त्यांना बुकर या सर्वोच्च सन्मानानेही सन्मानित करण्यात आलं आहे.