ड्रग्ज पेडलर्सना अभय, कलाकरांकडून खंडणी! समीर वानखेडेंनी मुंबई शहर ‘पाताल लोक’ बनवलं-नवाब मलिक

मुंबई तक

ड्रग्ज पेडलर्सना अभय देण्यासाठी समीर वानखेडे प्रायव्हेट आर्मी चालवतात. मोहीत कंबोज, सुनील पाटील, के. पी. गोसावी हे सगळे त्याचाच भाग आहेत. प्रभाकर साईल माझ्याकडे आला होता त्याला मी काहीही पढवलं नाही. मी त्याला प्रतिज्ञापत्र करण्यास सांगितलं. माझी लढाई खोटारड्या समीर वाखेडेंच्या विरोधात आहे. समीर वानखेडे, व्ही. व्ही सिंग, असीस ऱंजन, वानखेडेंचा ड्रायव्हर माने ही चांडाळ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

ड्रग्ज पेडलर्सना अभय देण्यासाठी समीर वानखेडे प्रायव्हेट आर्मी चालवतात. मोहीत कंबोज, सुनील पाटील, के. पी. गोसावी हे सगळे त्याचाच भाग आहेत. प्रभाकर साईल माझ्याकडे आला होता त्याला मी काहीही पढवलं नाही. मी त्याला प्रतिज्ञापत्र करण्यास सांगितलं. माझी लढाई खोटारड्या समीर वाखेडेंच्या विरोधात आहे. समीर वानखेडे, व्ही. व्ही सिंग, असीस ऱंजन, वानखेडेंचा ड्रायव्हर माने ही चांडाळ चौकडी आहे. त्यांना हाकला असंही आवाहन नवाब मलिक यांनी केलं आहे. एवढंच नाही तर ड्रग्ज पेडलर्सना अभय द्यायचं, त्यांच्याद्वारे ट्रॅप लावयाचे आणि हाय प्रोफाईल लोकांना अडकवून खंडणी वसूल करायची हे करून समीर वानखेडेंनी या शहराला ‘पाताल लोक’ बनवलं असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक आता गप्प बसणार नाही. मी आणि माझं कुटुंब ही लढाई शेवटापर्यंत घेऊन जाणार आहे. माझा जावईही मला म्हणाला की तुम्ही तुमची लढाई सुरू ठेवा. मी चुकीचा असलो तर मला वीस वर्षे तुरुंगात रहावं लागलं तरीही चालेल, पण मी खोट्या गुन्ह्यात अडकून शिक्षा भोगणार नाही असंही त्यांनी मला सांगितलं. शाहरुख खानला पहिल्या दिवसापासून घाबरवलं जातं आहे की नवाब मलिक बोलायचे थांबले नाहीत तर तुला आरोपी करू. आता ते समोर येतील का नाही मला माहित नाही.

समीर वानखेडेंची चौकशी केली पाहिजे, समीर वानखेडे खूप लोकांना धमक्या देऊन घाबरवत आहेत. रविवारी काही गोष्टी समोर आणणार होतो त्या आणल्या आहेत. जोपर्यंत यातला व्हिलन तुरुंगात जात नाही तोपर्यंत हा पिक्चर संपणार नाही. सुनील पाटील यांच्या नावे हॉटेल ललितमध्ये रूम बुक केली होती. तिथे घाणेरडे प्रकार चालत होते. मी त्याबद्दल आज फार मिळणार नाही. विजय पगारे यांनी मला ही माहिती दिली होती. मनिष भानुशाली, सॅम डिसुझा, केपी. गोसावी हे सगळे तिथे येत होते. तिथे मुलींना आणलं जात होतं, ड्रग्ज घेतले जात होते.

हा सगळा खेळ सॅम डिसूझा, मोहित कंबोज यांनी रचला होता. त्यांचे सगळे प्रकार समोर येतीलच. आम्ही 26 प्रकरणांच्या चौकशीची मागणी केली आहे. आर्यन खान, समीर खान प्रकरणांसह सहा प्रकरणं समीर वानखेडेंकडून काढण्यात आलं आहे. मला घाबरवण्याचा प्रयत्न केला तरीही मी घाबरणार नाही. क्रूझवर एक नमास स्प्रे नावाचा एक पेपर स्प्रे पकडण्यात आला. ही कंपनी काशिफ खानचा आहे. पेपर स्प्रेतून ड्रग्ज घेतलं जातं. हा फॅशन टीव्हीचा इंडिया हेड असल्याचं सांगतो पण त्याचे अनेक काळे व्यवहार आहेत. काशिफ खानने मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनाही त्या पार्टीला बोलवलं होतं. काशिफ खान हा समीर वानखेडेंचा साथीदार आहे. अस्लम शेख यांनाही क्रूझसाठी बोलवण्यात आलं होतं तुम्ही त्यांना विचारू शकता असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp