राहुल गांधींनी संजय राऊतांकडे व्यक्त केली खंत; ‘त्या’ बैठकीबद्दल राऊतांचं प्रथमच भाष्य
लखीमपूर खीरीतील हिंसाचारानंतर भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना नजरकैद करण्यात आलं होतं. त्यांना नजरकैद केल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीत काय चर्चा झाली याबद्दल राऊत यांनी त्यावेळी फार माहिती दिली नाही. मात्र, आता त्यांनी याबद्दल सविस्तर भाष्य केलं आहे. लखीमपूर खीरी येथे […]
ADVERTISEMENT

लखीमपूर खीरीतील हिंसाचारानंतर भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना नजरकैद करण्यात आलं होतं. त्यांना नजरकैद केल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीत काय चर्चा झाली याबद्दल राऊत यांनी त्यावेळी फार माहिती दिली नाही. मात्र, आता त्यांनी याबद्दल सविस्तर भाष्य केलं आहे.
लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्यात आलं. यानंतर संतप्त भावना उमटल्या. या घटनेवरून योगी सरकारवर विरोधकांनी निशाणा साधला. दरम्यान, याच काळात संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. प्रियंका गांधी यांना झालेली अटक आणि राहुल गांधी यांच्या भेटीबद्दल संजय राऊत यांनी ‘रोखठोक’मधून भाष्य केलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत…?
मंगळवारी दुपारी मी दिल्लीत राहुल गांधी यांना भेटलो. 12, तुघलक लेन हे त्यांचे निवासस्थान. राहुल गांधी लाल रंगाचे टी-शर्ट व पायजमा अशा साध्या वेशात गप्पा मारत होते. ‘या लोकांनी देशात काय चालवले आहे पाहा.’ अशी सुरुवात गांधी यांनी केली.