विधानसभेत पंतप्रधान मोदींची नक्कल; संजय राऊतांनी फडणवीसांना दिलं उत्तर

मुंबई तक

विधानसभेत चर्चा सुरू असताना शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लकबीत भाष्य केलं होतं. पंतप्रधानांची नक्कल केल्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. भास्कर जाधवांनी माफी मागितल्यावर या प्रकरणावर पडदा पडला. मात्र, आता याच मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. संजय राऊत यांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

विधानसभेत चर्चा सुरू असताना शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लकबीत भाष्य केलं होतं. पंतप्रधानांची नक्कल केल्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. भास्कर जाधवांनी माफी मागितल्यावर या प्रकरणावर पडदा पडला. मात्र, आता याच मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.

संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत इतर नेत्यांच्या केलेल्या नकलांचे संदर्भ देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “लोकप्रतिनिधींचे चाळे पाहतो तेव्हा मला माझ्या कुत्र्यांची आठवण येते असे सांगितले गेले, पण अनेकदा ‘माकडचेष्टा’ हाच शब्दप्रयोग त्यासाठी उपयुक्त ठरेल”, असं राऊत म्हणाले.

भास्कर जाधवांना लाज वाटली पाहिजे; नक्कल पाहून देवेंद्र फडणवीस भडकले

“महाराष्ट्राच्या विधानसभेत भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदी यांची नक्कल केली म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांसह सभागृह डोक्यावर घेतले. ‘पंतप्रधानांची नक्कल कोण, कशी करू शकतो?’ हा त्यांचा प्रश्न होता. आमच्या देशाचे पंतप्रधान म्हणजे सर्वश्रेष्ठ व्यक्ती. तिचे वागणे, बोलणे इतके उपहासाचे व्हावे हे चांगले नाही, पण जाधव यांनी नक्कल केली म्हणजे काय केले? देशातील प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात पंधरा लाख रुपये टाकू, असे वचन मोदी यांनी निवडणूक प्रचारसभांतून 2014 मध्ये दिले होते ते मोदींच्याच लकबीत जाधव सांगत राहिले.’

हे वाचलं का?

    follow whatsapp