Wari ला संमती द्या अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
पंढरपूरच्या आषाढी वारीला संमती द्यावी यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. महाराष्ट्राची माऊली म्हणजे विठुमाऊली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारी काढली जाते. गेल्यावर्षी आणि यावर्षी कोरोना असल्याने वारीला संमती देण्यात आलेली नाही. वारीला संमती मिळावी म्हणून वारकऱ्यांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे. काय म्हटलं आहे […]
ADVERTISEMENT

पंढरपूरच्या आषाढी वारीला संमती द्यावी यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. महाराष्ट्राची माऊली म्हणजे विठुमाऊली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारी काढली जाते. गेल्यावर्षी आणि यावर्षी कोरोना असल्याने वारीला संमती देण्यात आलेली नाही. वारीला संमती मिळावी म्हणून वारकऱ्यांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे.
काय म्हटलं आहे सुप्रीम कोर्टाने?
महाराष्ट्र सरकारने कोव्हिड संकट लक्षात घेऊन वारीवर बंदी घातली आहे. त्यामुळे या वारीला संमती देण्याचा काही प्रश्नच येत नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. तसंच महाराष्ट्र सरकारच्या बाजूने आणि वारकऱ्यांच्या विरोधात निकाल दिला आहे. वारीमध्ये गर्दी झाली तर कोरोना वाढण्याचा धोका आहे त्यामुळे याचिका फेटाळण्यात आल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
याचिकाकर्त्यांनी ही बंदी अकारण घातली असल्याचं आपल्या याचिकेत म्हटलं आहे. आम्ही कोव्हिडचे सगळे प्रोटोकॉल पाळू आणि मर्यादित स्वरूपात वारी काढू असंही वारकऱ्यांनी म्हटलं होतं. मात्र या वारीला सलग दुसऱ्या वर्षी संमती नाकारण्यात आली आहे त्यामुळे हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं होतं. आता सुप्रीम कोर्टानेही यासंबंधीची याचिका फेटाळून लावली आहे.