Schools Reopen : 17 ऑगस्टपासून महाराष्ट्रातल्या शाळा सुरू होणार-वर्षा गायकवाड

मुंबई तक

गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद होत्या त्या आता सुरू कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे. 8 वी ते 12 वी शहरी भागात आणि पाचवी ते बारावी ग्रामीण भागात शाळा सुरू करण्यात येतील अशी महत्त्वाची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनाचे सगळे प्रोटोकॉल पाळणं विद्यार्थी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद होत्या त्या आता सुरू कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे. 8 वी ते 12 वी शहरी भागात आणि पाचवी ते बारावी ग्रामीण भागात शाळा सुरू करण्यात येतील अशी महत्त्वाची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनाचे सगळे प्रोटोकॉल पाळणं विद्यार्थी आणि शाळा प्रशासनासाठी महत्त्वाचं असणार आहे असंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच शाळा सुरू करण्याच्या नियमावलीवर सध्या काम सुरू असून ती नियमावली लवकरच जाहीर केली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोनामुळे मार्च 2020 पासून राज्यातल्या शाळा बंद आहेत. मात्र आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शाळा पुन्हा एकदा सुरू होणार आहेत.

‘येत्या 17 ऑगस्टपासून राज्यातल्या शाळा आम्ही पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेत आहोत. कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी झाली आहे अशा ठिकाणी पाचवी ते आठवीच्या शाळाही सुरू केल्या जातील.’

वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री , महाराष्ट्र

कोरोना काळात राज्यातील शाळा पूर्णपणे बंद असल्याने लाखो विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत होते. कोरोनाचा वाढता संसर्ग, पहिली लाट आणि दुसरी लाट या दोन्ही दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या. आता कोरोनाचं प्रमाण काहीसं नियंत्रणात येत असल्याचं दिसत असल्यामुळे राज्यात शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात कोरोनाचे निर्बंध लागू आहेत. कोरोनाच्या स्थानिक परिस्थितीनुसार कोरोनाचे निर्बंध देखील काही ठिकाणी शिथील तर काही ठिकाणी कठोर अशा स्वरूपाचे आहेत. कोरोना रूग्णसंख्या कमी झालेल्या राज्याच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे. त्यासाठी कोरोनाच्या रूग्णांची संख्या आणि इतर अटी घालून दिल्या आहेत. आता त्यामध्ये अधिकच्या वर्गांचा समावेश करण्यात आला आहे.

काय म्हणाल्या आहेत वर्षा गायकवाड?

‘येत्या 17 ऑगस्टपासून राज्यातल्या शाळा आम्ही पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेत आहोत. कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी झाली आहे अशा ठिकाणी पाचवी ते आठवीच्या शाळाही सुरू केल्या जातील. त्यासोबत शहरी भागात म्हणजेच महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत क्षेत्रातील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या समितीप्रमाणेच शहरी भागांसाठीही समितीची नियुक्ती करण्यात येईल’

हे वाचलं का?

    follow whatsapp