पाहा राजीनाम्यानंतर संजय राठोडांची पहिली प्रतिक्रिया, जशीच्या तशी

मुंबई तक

मुंबई: संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर माध्यमांसमोर येऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पाहा संजय राठोड यांची प्रतिक्रिया जशीच्या तशी… संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया जशीच्या तशी… ‘मी माझा राजीनामा माननीय मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या बंजाराचा समाजाची जी तरुणी होती पूजा चव्हाण हिचा जो दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूवरुन विरोधी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर माध्यमांसमोर येऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पाहा संजय राठोड यांची प्रतिक्रिया जशीच्या तशी…

संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया जशीच्या तशी…

‘मी माझा राजीनामा माननीय मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या बंजाराचा समाजाची जी तरुणी होती पूजा चव्हाण हिचा जो दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूवरुन विरोधी पक्षाने मीडिया, सोशल मीडिया यांच्या माध्यमातून जे काही अतिशय घाणेरडं राजकारण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. मीडियाच्या माध्यमातून आमच्या समाजाची, माझी वैयक्तिक बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मला राजकीय जीवनातून उठविण्याचा प्रयत्न यावेळी मी पाहिला.’

‘गेले ३० वर्ष माझं जे सामाजिक, राजकीय जे काम होतं ते उदध्वस्त करण्याचं काम हे याठिकाणी झालेलं आहे हे मी मागे देखील बोललो आहे. म्हणून या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी हीच माझी मागणी आहे याचा तपास व्हावा ही माझी मागणी आहे. म्हणून या ठिकाणी मी बाजूला राहून ही चौकशी व्हावी ही माझी भूमिका आहे. तपास व्हावा सत्य बाहेर यावं. खरं सत्य बाहेर यावं. ही माझी भूमिका आहे. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना मी त्या पद्धतीचं बोललो आणि माझा राजीनामा सुद्धा मी दिलेला आहे. मी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देऊन बाहेर आलेलो आहे. माझ्यासोबत आमचे संसदीय कार्यमंत्री साहेब अनिल परब होते. आमचे शिवसेना पक्षाचे सचिव अनिल देसाई होते. हे सुद्धा साक्षीदार आहेत मी त्यांना राजीनामा दिलेला आहे यांचे.’

हे वाचलं का?

    follow whatsapp