पाहा राजीनाम्यानंतर संजय राठोडांची पहिली प्रतिक्रिया, जशीच्या तशी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर माध्यमांसमोर येऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पाहा संजय राठोड यांची प्रतिक्रिया जशीच्या तशी…

संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया जशीच्या तशी…

‘मी माझा राजीनामा माननीय मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या बंजाराचा समाजाची जी तरुणी होती पूजा चव्हाण हिचा जो दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूवरुन विरोधी पक्षाने मीडिया, सोशल मीडिया यांच्या माध्यमातून जे काही अतिशय घाणेरडं राजकारण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. मीडियाच्या माध्यमातून आमच्या समाजाची, माझी वैयक्तिक बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मला राजकीय जीवनातून उठविण्याचा प्रयत्न यावेळी मी पाहिला.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘गेले ३० वर्ष माझं जे सामाजिक, राजकीय जे काम होतं ते उदध्वस्त करण्याचं काम हे याठिकाणी झालेलं आहे हे मी मागे देखील बोललो आहे. म्हणून या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी हीच माझी मागणी आहे याचा तपास व्हावा ही माझी मागणी आहे. म्हणून या ठिकाणी मी बाजूला राहून ही चौकशी व्हावी ही माझी भूमिका आहे. तपास व्हावा सत्य बाहेर यावं. खरं सत्य बाहेर यावं. ही माझी भूमिका आहे. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना मी त्या पद्धतीचं बोललो आणि माझा राजीनामा सुद्धा मी दिलेला आहे. मी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देऊन बाहेर आलेलो आहे. माझ्यासोबत आमचे संसदीय कार्यमंत्री साहेब अनिल परब होते. आमचे शिवसेना पक्षाचे सचिव अनिल देसाई होते. हे सुद्धा साक्षीदार आहेत मी त्यांना राजीनामा दिलेला आहे यांचे.’

‘मी सध्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. याठिकाणी माझी सातत्याने भूमिका राहिलेली आहे तपास होऊ द्या, पोलीस चौकशी करत आहेत. सत्य जे काही आहे ते बाहेर येऊ द्या. ही माझी भूमिका होती. परंतु ज्या पद्धतीने राजकारण केलं गेलं, ज्यापद्धतीने उद्या आम्ही अधिवेशन चालू देणार नाही… हे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या विरोधात आहे. लोकशाहीच्या विरोधात आहे.’

ADVERTISEMENT

‘खरं तर कोणत्याही प्रकरणाची चौकशी झालं पाहिजे. त्याच्यानंतर जे काही परिणाम आहेत ते भोगायला पाहिजेत. परंतु जे विरोधक आहे त्यांना मात्र या ठिकाणी अधिवेशन चालू देणार नाही अशी भूमिका घेतली. माझ्या वैयक्तिक जीवनावर, समाजावर ज्या पद्धतीचा परिणाम झाला म्हणून मी या पदापासून दूर होण्याचा निर्णय घेतला आणि चौकशी निष्पक्ष झाली पाहिजे ही सुद्धा माझी भूमिका आहे. तपास योग्य पद्धतीने झाला पाहिजे आणि तपासातून सत्य बाहेर आला पाहिजे.’

ADVERTISEMENT

‘या’ प्रकरणामुळे संजय राठोडांना गमवावं लागलं मंत्रिपद –

७ फेब्रुवारीला पुण्यात 21 वर्षीय पूजा चव्हाण हिने आत्महत्या केली. या प्रकरणात पूजा चव्हाणच्या काही ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. या ऑडिओ क्लिप व्हायरल एक आवाज हा संजय राठोड यांच्याशी मिळताजुळता असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली. त्यातच संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे एकत्र फोटो समोर आल्यानंतर विरोधकांनी शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. याप्रकरणी संजय राठोड यांच्यावर जेव्हा भाजप नेत्यांकडून आरोप करण्यात येत असतान देखील संजय राठोड हे समोर आले नव्हेत. तब्बल 15 दिवसानंतर मीडियासमोर येऊन त्यांनी आपली बाजू मांडली होती. मात्र तरीही विरोधकांनी या प्रकरणी सरकारला घेरणं सुरुच ठेवलं होतं. अखेर वाढता दबाव लक्षात घेऊन आज (28 फेब्रुवारी) संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला.

राजीनाम्याची नेमकी बातमी पाहा: मोठी बातमी! वनमंत्री संजय राठोड यांचा अखेर राजीनामा

पोहरादेवी मधलं शक्तीप्रदर्शनही राठोडांना भोवल्याची चर्चा –

बंजारा समाजाचं देवस्थान असलेल्या पोहरादेवी संस्थान येथे शक्तीप्रदर्शन करत संजय राठोड हे सर्वांसमोर आले होते. यावेळी संजय राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो समर्थक पोहरादेवी संस्थानाच्या परिसरात हजर होते. मात्र, याच्या एक दिवस आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना राज्यात कोरोनाच्या केसेस वाढत असून घराबाहेर पडताना लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचं भान पाळावं असं आवाहन केलं होतं. तसेच राजकीय व धार्मिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली होती. मात्र संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हरताळ फासत पोहरादेवी गडावर शक्तीप्रदर्शन करुन हजारोंचा जमाव गोळा करत राज्य सरकार तोंडघशी पडलं होतं. त्यामुळे राठोडांबद्दल महाविकास आघाडी सरकारमध्ये अधिक नाराजीचं वातावरण निर्माण झालं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT